04 March 2021

News Flash

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; दोन जवान जखमी

हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर; परिसर सील करून शोधमोहीम सुरू

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बारजुल्ला भागात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशवताद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर घटनास्थळाच्या आसपासचा परिसर जवानांनी सील केला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात जोरादरा मोहीम राबवली जात आहे, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामुळे दहशतवादी संघटना अधिकच चवताळल्या असल्याचे दिसत आहे.

या अगोदर शोपियांमधील बडगाममध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे या चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हे लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 1:52 pm

Web Title: terrorists attacked a police party in barzulla area of district srinagar msr 87
Next Stories
1 पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपा मंत्र्याने मानले मोंदीचे आभार
2 ‘वो जुमलों का शोर मचाते हैं, हम…’, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राहुल गांधींची शेरोशायरी!
3 ऐकावं ते नवलच; गर्लफ्रेंडला भेट द्यायला चोरलं उंटाचं पिल्लू; खायला लागली जेलची हवा
Just Now!
X