देशामधील काही शहरांचे नामांतरण झाल्यानंतर आता सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याची तयारी सुरु केली आहे. सरकारने नुकत्याच जारी केलेल्या जागांच्या नामांतरणाच्या यादीमध्ये या बेटांचा समावेश आहे. बेट समुहातील रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाषचंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात येणार असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयर येथे भारतीय तिरंगा फडकावल्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे नामांतरण करण्याचा सरकारचा विचार आहे. बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा झेंडा फडकवला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते. त्यावेळेस त्यांनी अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज द्विप अशी नावं द्यावीत अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.

PM Narendra Modi On Rahul Gandhi
‘युवराज’ उत्तर प्रदेशातली जागा वाचवू न शकल्याने केरळमध्ये आले; मोदींचा राहुल गांधींवर हल्ला
Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

मार्च २०१७मध्ये एका भाजपा नेत्याने राज्यसभेमध्ये हेवलॉक आइसलॅण्डच्या नामांतरणाची मागणी केली. १८५७ च्या उठावामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांविरुद्ध लढलेल्या व्यक्तीच्या नावाने हे बेट ओळखले जाते हे लज्जास्पद असल्याचे मत एल.ए. गणेशन यांनी व्यक्त केले होते. ब्रिटिश अधिकारी हेन्री हेवलॉक यांच्या नावावरुन बेटाचे नामकरण करण्यात आले आहे. हे अंदमान निकोबार बेट समुहातील सर्वात मोठे बेट आहे. लवकरच या बेटाचे नाव स्वराज द्विप असं करण्यात येणार आहे.