03 March 2021

News Flash

कांचनगंगा शिखरावर पोहचताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू

एका गिर्यारोहकाचा मृत्यू आजारी पडल्याने तर दुसऱ्या गिर्यारोहकाचा मृत्यू कोसळून झाला

संग्रहित छायाचित्र

कांचनगंगा हे नेपाळमधलं सर्वोच्च शिखर मानलं जातं. या शिखरावर पोहचताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बिप्लब बैद्य आणि कुंतल कनरार अशी या दोघांची नावं आहेत. बिप्लब बैद्य हे ४८ वर्षांचे तर कुंतल हे ४६ वर्षांचे होते. बिप्लब बैद्य गिर्यारोहण करताना आजारी पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कुंतल करनार शिखरावर चढताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. बैद्य हे ८ हजार ५८६ मीटर्स अंतरापर्यंत चढाई करून गेले होते.

बिप्लब बैद्य हे आजारी झाले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं समजतं आहे. एएनआय आणि रॉयटर्स या दोन वृत्तसंस्थांनी या संदर्भातले वृत्त दिले आहे. कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 1:49 pm

Web Title: two indian climbers died near the summit of mount kanchenjunga during an expedition on the worlds third highest mountain in nepal
Next Stories
1 शिक्षेचा अघोरी प्रकार! पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणींना झाडाला बांधून मारहाण
2 मुस्लीमविरोधी दंगली : श्रीलंकेच्या लष्कराचं सोशल आवाहन
3 सगोत्री विवाह करणाऱ्या तरुणावर मेहुण्याचा गोळीबार
Just Now!
X