आपल्या सौरमालेत असलेल्या शिरॉन या लहान ग्रहाभोवती शनीप्रमाणेच कडी असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. आपल्या सौरमालेत पाच ग्रहांना कडी आहेत त्यात शनीची कडी मोठी आहेत. गुरू, युरेनस व नेपच्यून या ग्रहांभोवती वायू व धुळीची कडी आहेत. त्यामुळे कडी असलेला सहावा ग्रह आता सापडला आहे.
वैज्ञानिकांना सेंटॉर ग्रहमालिकेतील शारिकलो वर्गातील शिरॉन ग्रहाभोवती ही कडी सापडली आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये एक तारकीय प्रतियुती झाली होती त्यात शिरॉन ग्रह हा प्रकाशमान ताऱ्यासमोरून गेला होता त्यावेळी त्याचा प्रकाश अडला होता. संशोधकांच्या मते ताऱ्याच्या प्रकाशाचा अभ्यास केला असता शिरॉन ग्रहाने काही क्षण सावली निर्माण केली होती. त्यावरून या सेंटॉर स्वरूपाच्या ग्रहाभोवती कचऱ्याचा समावेश असलेली कडी असल्याचे लक्षात आले. ही कडी वायू व धुळीची असून सेंटॉरच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणाऱ्या प्रारणांचा प्रवाहही असू शकतो. एमआयटीच्या पृथ्वी, वातावरण व ग्रह विज्ञान विभागाचे प्रा. अमंदा बोश यांनी सांगितले की, सेंटॉर या सौरमालेच्या मध्यातील भागात असलेल्या ग्रहांमधील शिरॉन ग्रहाभोवती कडी आहेत ही आश्चर्याची बाब आबे. हा ग्रहांचा पट्टा गुरू व प्लुटो दरम्यान येतो.
या भागात काही क्रियाशील पदार्थ असतील असे वाटत नव्हते पण ते आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. शिरॉन या ग्रहाचा शोध १९७७ मध्ये लागला. तो सेंटॉर वर्गातील असून त्याला पुराणकथेतील जनावर व माणूस यांच्या संकर असलेल्या प्राण्याचे नाव देण्यात आले आहे. सेटॉर्स हे नावाप्रमाणेच संकरित असून त्यात लघुग्रह व धुमकेतू यांचे संमिश्र अंश आढळतात. हवाई येथील दुर्बीणीतून या ग्रहाचे निरीक्षण करण्यात आले असून त्याच्या मातृताऱ्याची प्रतियुती पाहून त्याच्याभोवती कडी असल्याचे दिसून आले आहे. या ग्रहाची कडी वायू किंवा धुळीची असावीत असे बोश यांचे मत आहे. जेव्हा एखादा अवकाशीय पदार्थ फुटतो तेव्हा गुरुत्वाने तो कचरा ओढून धरू शकतो  तसेच शिरॉनच्या बाबतीत झाले असावे.
शिरॉनच्या निर्मितीनंतरच्या अवशेषांपासूनही ही कडी तयार झाली असावीत. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी प्रतियुतीच्या माहितीचा अभ्यास करून या कडय़ांचा शोध लावला आहे. इकारस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.