18 January 2021

News Flash

वाहनधारकांना नितीन गडकरींकडून दिलासा, करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ निर्णय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय...

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

जर मोटार वाहनाशी संबंधित तुमचे कोणतेही कागदपत्र कालबाह्य झाले असतील किंवा होणार असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण या निर्णयामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकणार आहात. 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य होणाऱ्या किंवा आतापासून 31 डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणाऱ्या मोटार वाहन कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ती मुदतवाढ नंतर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 8:11 am

Web Title: validity of driving licences and motor vehicle documents extended till 31 dec check details sas 89
Next Stories
1 हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना करोना
2 प्रशांत भूषण यांना समज द्या, शिक्षा नको!
3 अध्यक्षपद तूर्त सोनियांकडेच!
Just Now!
X