पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका गेल्या महिन्याभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या निवडणुकांवर सोशल मीडियावरही बरेच दावे-प्रतिदावे आणि मीम्सही व्हायरल झाले होते. सध्या पाकिस्तानमधील एका प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील एका न्यायालयाने एका २२ वर्षांच्या तरुणाला फाशीची शिक्षा ठोठावली असून एका अल्पवयीन मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयाने हा निर्णय दिला असून गेल्या वर्षी यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.

पाकिस्तानमधील ईशनिंदेचं प्रकरण नेमकं काय?

पाकिस्तान इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात FIA नं २०२२ मध्ये लाहोर येथे यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई सुरू केली होती. एका तक्रारदार व्यक्तीने तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून आक्षपार्ह फोटो आणि व्हिडीओ आपल्याला आल्याचा दावा या तक्रारीत केला होता. एफआयएनं यासंदर्भात तक्रारदाराचा मोबाईल तपासला असता त्यात आक्षेपार्ह मजकूर त्याला मोबाईलवर पाठवण्यात आल्याचं निष्पन्न झालं.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

काय होता मजकूर?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयाने यासंदर्भातील शिक्षा सुनावताना व्हॉट्सअ‍ॅपवरील आक्षेपार्ह मजकूर ग्राह्य धरला. या मजकुरामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला होता. मात्र, आपल्या अशिलाला या प्रकरणात फसवण्यात आल्याचा दावा या दोन्ही विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. तसेच, लाहोरच्या उच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

Video: रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना लाथ मारून हाकललं; पोलीस अधिकारी निलंबित, नागरिकांचं म्हणणं काय?

पहिल्यांदाच सुनावली फाशीची शिक्षा

पाकिस्तानमध्ये ईशनिंदेसाठी देहदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, आजतागायत पाकिस्तानमध्ये ईशनिंदेसाठी कोणत्याही गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्यात आलेला नाही. त्यामुळे या शिक्षेची अंमलबजावणी होणार का? याबाबत पाकिस्तानच्या राजकीय व सामाजिक वर्तुळामध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये दोन ख्रिश्चन भावंडांनी कुराणबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ख्रिश्चन व्यक्तींची ८० घरं आणि १९ चर्चचं नुकसान करण्यात आलं होतं. त्याशिवाय पाकिस्तानमधील एका हाय प्रोफाईल प्रकरणात ईशनिंदेसाठी आसिया बीबी नामक ख्रिश्चन व्यक्तीविरोधात जवळपास दशकभर चाललेल्या एका खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र. नंतर ती शिक्षा रद्द करण्यात आली होती.