जम्मू-काश्मीरला सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले. हा धक्का ४.५ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सोमवारी पहाटे ४.२८ मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे राज्यात कोणतीही जीवित व वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी चारच्या सुमारासही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ही ४.७ इतकी होती. शनिवारी भूकंपाचा केंद्रबिंदू हा लेहपासून ९८ किलोमीटर अंतरावर होता.

तर मागील गुरूवारीही जम्मू-काश्मीर सहीत लडाखच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुरूवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता ही ५.१ इतकी होती. याचा केंद्रबिंदू हा भारताच्या ईशान्य भागातील थांग येथे होता.