Dusting Challenge या ठिकाणी राहणारी १९ वर्षीय मुलगी रिना ओ रुरकेचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावरचा डस्टिंग चॅलेंज नावाचा एक ट्रेंड फॉलो करत असताना तिचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर तिच्या मृत्यूची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

डस्टिंग चॅलेंज काय आहे?

अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील १९ वर्षीय रेना ओरुरकेने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डस्टिंग चॅलेंज’मध्ये भाग घेतला. या धोकादायक ट्रेंडमध्ये कीबोर्ड क्लिनिंग स्प्रेचा वास घेतला जातो. रेनाला हे करताना हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोमात गेली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवसांच्या उपचारांनंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

रिनाने काय केलं?

रिना सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती व्हिडीओ आणि रिल्स पोस्ट करायची. डस्टिंग चॅलेंज करताना तिचा मृत्यू झाला. या चॅलेंजला क्रोमिंगही म्हटलं जातं. या चॅलेंजमध्ये लोक कीबोर्ड क्लिनर स्प्रेचा वास घेतात आणि तेव्हा त्यांनी कॅमेरा सुरु केलेला असतो. त्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज हवे असतात. रिनानेही हेच केलं ज्यात तिला कार्डिअॅक अरेस्ट आला. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिला सात दिवसांनी मृत घोषित करण्यात आलं. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रिनाच्या वडिलांनी नेमकं काय सांगितलं?

रिनाचे वडील आरोन यांनी सांगितले, “ती नेहमी म्हणायची, ‘मी प्रसिद्ध होणार, बाबा.’ पण हे प्रसिद्धीचे स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होईल, हे आम्हाला कधीच वाटले नव्हते.” या ट्रेंडमध्ये वापरले जाणारे स्प्रे सहज उपलब्ध असतात, त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नसते. यामुळे हा ट्रेंड किशोरवयीन मुलांमध्ये लोकप्रिय झाला आहे. रेनाच्या आईने डाना नावाच्या स्थानिक वृत्तपत्राला सांगितले, “हे स्प्रे स्वस्त आहेत, सहज मिळतात आणि कुठल्याही ड्रग टेस्टमध्येही सापडत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिनाच्या कुटुंबाने वेबसाईटवर सुरु केली मोहीम

या घटनेनंतर रिनाच्या कुटुंबाने ‘Gofundme’ या वेबसाइटवर एक मोहीम सुरू केली आहे, ज्याद्वारे ते इतरांना या धोकादायक ट्रेंडबद्दल जागरूक करत आहेत. डस्टिंग किंवा क्रोमिंग हे ट्रेंड किशोरवयीन मुलांमध्ये वाढत आहेत. या ट्रेंडमुळे आधीही अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत. पालकांनी सतर्क राहणे, मुलांशी संवाद साधणे, आणि त्यांना या धोक्यांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे.रेनाच्या पालकांची इच्छा आहे की, त्यांच्या मुलीची कथा इतरांना सावध करेल आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना टाळता येतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.