एकमेकांवर सडेतोड टीका करणारे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एका मशिदीत एकमेकांशी गळाभेट घेतली.
चांदनी चौकमध्ये ईद निमित्त शेखान मशिदीमध्ये झालेल्या कार्यक्रमात केजरीवाल व सिब्बल यांची भेट झाली. यावेळी दोघांनी स्मितहास्य करत ईद-ए-मिलादच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि गळाभेट केली. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर या दोन कट्टर विरोधी नेत्यांची पहिल्यांदाच भेट झाली. राजकीय क्षेत्रात एकमेकांवर टीकास्त्र करणारे दोन विरोधक सणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैर विसरून स्मितहास्य करत एकत्र आले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
केजरीवाल, सिब्बल यांच्यात ‘जादू की झप्पी’!
एकमेकांवर सडेतोड टीका करणारे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एका मशिदीत एकमेकांशी गळाभेट घेतली.

First published on: 14-01-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal kapil sibals jhadoo ki jhappi at delhi event