काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. एवढंच नाही तर स्वतःला सेक्युलर म्हणवणारे हे पक्ष आहेत पण यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तेव्हाच त्यांचा खरा चेहरा उघड झाला होता असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. हिंमत असेल तर बाबरी मशिदीचं नाव घेऊन दाखवा असं खुलं आव्हानही असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं आहे.

काय म्हणाले ओवैसी?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना विचारा तुमच्यात बाबरीचं नाव घेण्याची हिंमत आहे का? स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मला नावं ठेवतील. मी चिथावणीखोर भाषण करतो असं म्हणतील. पण मला सांगा मी तुम्हा सगळ्यांच्या मनातलं बोलतोय की नाही? हे उद्या मला सांगतील आता विषय संपवा, झालं ते झालं. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना विसरु शकत नसाल तर मी माझी मशिद कशी काय विसरणार?” असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
sanjay raut vs congress
“नाराजी दाखवायची असेल तर आम्ही…”, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा
Ashok Chavan, Congress
अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”

६ डिसेंबर १९९२ कधीच विसरु नका

मला उद्या सांगितलं जाईल आता सोडून दे विषय ३० वर्षे होऊन गेली आहेत. ३० वर्षे नाही पुढची सगळी वर्षे ६ डिसेंबर १९९२ विसरु नका. ६ डिसेंबर १९९२ विसरलात पुन्हा एकदा तो दिवस येऊ शकतो. त्यामुळे हा दिवस कधीच विसरु नका. ज्या ठिकाणी मशीद बनली, तिथे मशीद होती आहे आणि राहणार हे विसरु नका. एक मुस्लिम खासदार आहेत दुसऱ्या पक्षाचे. मला म्हणाले आज चर्चा होणार आहे संसदेत मी तुमचं भाषण ऐकणार आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही या संसदेत. त्यावर मला म्हणाले मी येऊ शकत नाही पक्षाने नाही सांगितलं आहे.

हे पण वाचा- मी बाबर, औरंगजेबाचा प्रवक्ता आहे का? ओवेसींचे राम मंदिरावर भाषण; म्हणाले, “बाबरी जिंदाबाद…”

आम्ही बाबरीचं नाव संसदेत बाबरीचं नाव घेतलं आहे. जोपर्यंत कयामत येईल तोपर्यंत आम्ही हे सांगत राहणार. आम्ही अमित शाह यांच्यासमोर बाबरी जिंदाबादचे नारे दिले आहेत. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीने काहीही शिकवू नये. बाबरी मशीद जिवंत होती आणि राहिल. तुमच्या हृदयात बाबरी आहे की नाही? मी तुमच्या मनातलं बोलतोय की नाही? तुमच्याकडे हे सगळे पोपटपंची करायला येतील. आता सगळं विसरा सांगतील. पण बाबरी विसरायची नाही हे लक्षात ठेवा असंही आवाहन ओवैसी यांनी म्हटलं आहे.