केंद्राने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केल्यानंतर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीनंतर आसाम मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

गुवाहाटीच्या उत्तर-पूर्वेस सुमारे १२० किमी अंतरावर ओरंग उद्यान आसामच्या सात राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि गेंड्यांच्या पहिल्या तीन निवासस्थानांपैकी एक आहे.तर देशात वाघांची संख्या सर्वाधिक असलेल्या क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे.

“ओरंग राष्ट्रीय उद्यानाचे मूळ नाव पुनर्संचयित करण्याचा निर्णय राज्यातील आदिवासी गटांच्या विनंतीनंतर घेण्यात आला”, असे सरकारचे प्रवक्ते पीजूष हजारिका यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. ओरंगला १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आणि १९९९ मध्ये राष्ट्रीय उद्यानात सुधारित करण्यात आले. तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात हे राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान बनले. राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मार्च २०१६ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले होते.या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ ४९२.४६ चौ. किमी. आहे.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा…

आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीने भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या अशा “क्षुद्र वृत्ती”चा निषेध केला. “पार्क किंवा संस्थेचे नाव बदलून ते भविष्यातील भारताचे शिल्पकार म्हणून राजीव गांधींचे योगदान पुसून टाकू शकत नाहीत. इतिहास पुन्हा लिहिण्याचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजप आज ज्या कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनचा वापर करत आहे, ते त्यांना राजीव गांधींनी आणलेल्या आयटी क्रांतीद्वारे उपलब्ध करून दिले होते”, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा म्हणाले.

१९८५ मध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि आसाममध्ये सरकार स्थापन करण्यासाठी असम गण परिषदेचा मार्ग तयार करण्यासाठी राजीव गांधींनी निवडून दिलेल्या काँग्रेस सरकारचा राजीनामा दिला.“त्यांनी हे केले कारण त्याने त्यावेळी आसामी लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांचा आदर केला. पण आजच्या भाजपाला अशा प्रकारचे राजकारण समजणार नाही. कारण ते फक्त संस्थांची नावे बदलण्यात, भारताच्या अजेंडावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात व्यस्त आहेत जिथे त्यांचे योगदान शून्य आहे. आणि सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांकडून राजकारणी विकत घेत आहेत”, असंही बोरा म्हणाले.