विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे, असा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे.
बिहारमध्ये सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, थेट सत्ता मिळाली नाही तर राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून ती मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे मायावती यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
दिल्लीतील पराभवामुळेही भाजपला शहाणपण आलेले नाही, झारखंडमध्येही भाजप जुन्याच क्लृप्त्या वापरून फोडाफोडीचे राजकारण करीत आहे, असेही मायावती म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रपती राजवटीचा भाजपचा प्रयत्न- मायावती
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे
First published on: 14-02-2015 at 02:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar crisis bjp trying to get presidents rule imposed in bihar mayawati