उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली असून भाजप तेथे सर्व पर्यायांचा विचार करीत आहे. राज्यात निवडणुका घेण्यात आल्यास भाजप बहुमताने विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला.
उत्तराखंड भाजप सर्व पर्यायांवर चर्चा करीत आहे. वस्तुस्थितीवर आधारित निर्णय घेतला जाईल. राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यास भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असे नक्वी म्हणाले. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे जोरदार समर्थन नक्वी यांनी केले. घटनात्मक पेच होता, त्यामुळे केंद्र सरकारने आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडली, असेही नक्वी म्हणाले. पंतप्रधान मोदी काँग्रेसची सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपाचे नक्वी यांनी खंडन केले. काँग्रेसचा जनाधार घटत चालला आहे, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2016 रोजी प्रकाशित
भाजपकडून पर्यायांची चाचपणी – नक्वी
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली असून भाजप तेथे सर्व पर्यायांचा विचार करीत आहे.

First published on: 29-03-2016 at 01:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp exploring all options in uttarakhand says union minister naqvi