BJP MLA watching porn in Assembly: विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित आमदाराच्या पाठीमागे बसलेल्या अन्य एका आमदाराने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृ्त्तानुसार, संबंधित आमदाराचं नाव जादब लाल नाथ असून ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. जादब लाल नाथ हे त्रिपुरातील बागबासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. घटनेच्या दिवशी त्रिपुरा विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, यावेळी आमदार जादब लाल नाथ हे आपल्या फोनवर पॉर्न पाहताना आढळले आहेत.

आमदार नाथ हे आपल्या फोनवर काही व्हिडीओ स्क्रोल करत होते. दरम्यान, त्यांच्या फोनवर पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. यानंतर आमदार नाथ यांनी आपण सभागृहात आहोत, याचं भान विसरून संबंधित व्हिडीओ पाहिला. यावेळी काही आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत होते. हा संपूर्ण प्रकार सभागृहात अन्य एका आमदाराने रेकॉर्ड केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे भाजपा नेत्याने अशाप्रकारे सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचं पहिल्यांदाच घडलंय असं नाही. यापूर्वी २०१२ साली कर्नाटकमधील भाजपा सरकारचे दोन मंत्री सभागृहात पॉर्न पाहताना आढळले होते. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. लक्ष्मण सावदी आणि सीसी पाटील अशी संबंधित मंत्र्यांची नावं आहेत.