पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुनावलं आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असताना स्मृती इराणी यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी यांनी आपचे नेते गोपाल इटालिया यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे, ज्यामध्ये ते ९९ वर्षीय हिराबेन मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. यानंतर स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला असून, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा विनाश होईल असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ नेमका कधी शूट करण्यात आला आहे, हे समोर आलेलं नाही. दरम्यान ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करत म्हटलं आहे की “गटाराचं तोंड असणारे गोपाल इटालिया आता तुमच्या आशीर्वादाने हिरा बा यांना शिव्या देत आहेत”.

हेही वाचा – Andheri By Election: ऋतुजा लटके यांच्याबाबतीत भेदभाव का? मुंबई हायकोर्टाने खडसावलं, पालिका म्हणाली “आम्ही आदेश देतो, पण…”

“मी आक्रोश करणार नाही. मला गुजराती किती नाराज आहेत हेदेखील दाखवण्याची गरज नाही. पण आता तुमचा निकाला लागला आहे आणि निवडणुकीत तुमच्या पक्षाचा निश्चित पराभव होईल. आता जनताच तुम्हाला न्याय देईल,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी गोपाल इटालिया यांनी आपचे संयोजक म्हणून निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. २०१८ मधील व्हिडीओवरुन ही चौकशी होणार आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमिल मालविया यांनी रविवारी हा व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये गोपाल इटालिया नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच व्यक्ती’ असा केला होता.

गोपाल इटालिया यांनी नरेंद्र मोदींसाठी वापरलेली भाषा चुकीची आणि आक्षेपार्ह असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. तीन तासांच्या चौकशीनंतर सोडण्यात आलं तेव्हा, आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला.

हेही वाचा – “शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझं ऐकून घेण्याऐवजी त्यांनी पोलिसांना बोलावून मला पोलीस ठाण्यात पाठवलं. यारुनच भाजपा पटेल समाजाविरोधात कट रचत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या मनात पाटीदारांविरोधात राग आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत आमचा छळ करायचा आहे. पोलिसांनीही आपली चौकशी करण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश आल्याचं मान्य केलं आहे,” असं गोपाल इटालिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.