Chanda Kochhar Letter To Daughter Goes Viral: व्हिडिओकॉन ग्रुपला २००९ मध्ये ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी ६४ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. पीएमएलए अपीलीय न्यायाधिकरणाने पूर्वीची क्लीन चिट रद्द केली आणि ईडीच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय कायम ठेवला. यावेळी न्यायाधिकरणाने नमूद केले की, हे पैसे “गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न” होते.
हा खटला २००९ मध्ये आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जावर आणि त्यानंतर व्हिडिओकॉनशी संबंधित फर्मकडून कोचर यांचे पती दीपक कोचर चालवणाऱ्या न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटी रुपयांच्या हस्तांतरण प्रकरणाशी संबंधित आहे. कट रचणे आणि फसवणूक केल्याबद्दल सीबीआयच्या एफआयआरसह ईडीचा खटला आता ट्रायल कोर्टात सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोचर यांच्या जामिनावर नोटीसही जारी केल्या आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये, चंदा कोचर यांनी २०१६ मध्ये त्यांची मुलगी आरतीला लिहिलेले आणि एनडीटीव्हीने प्रकाशित केलेले एक पत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पत्रात मूल्ये आणि लवचिकतेचं प्रतिबिंब पाहायला मिळते, पण ते न्यायाधिकरणाच्या निष्कर्षांच्या अगदी उलट असल्याचे दिसून येत आहे. मुलीला लिहिलेल्या पत्रात चंदा कोचर म्हणाल्या आहे की;
“प्रिय आरती,
मी लंडनहून मुंबईला येण्यासाठी विमानात बसले तेव्हा मला जाणवले की, तू काही दिवसांतच पदवीधर होणार आहेस. आणि तू तुझे करिअर करण्यासाठी आणि तुझे जीवन घडविण्यासाठी भारतात परत येणार आहेस. मी आयुष्यात शिकलेले काही धडे तुझ्याशी शेअर करू इच्छिते आणि मला आशा आहे की, हे धडे तुला तुझ्या सुंदर प्रवासात मदत करतील.”
जेव्हा तू मोठी होशील तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र हो. तुला स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजेत आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे.
मी अशा काळात वाढले जेव्हा महिलांसाठी करिअरचे पर्याय मर्यादित मानले जात होते. माझ्या आईने मला प्रोत्साहन दिले म्हणून मी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिने मला सांगितले की, मी मला हवे ते करिअर करू शकते. म्हणून मी ते केले.
शॉर्टकट घेऊ नकोस. जे योग्य आहे ते कधीही विसरू नकोस. कारण तू काहीही कर, कुठेही जा, शेवटी तुझी मूल्येच कामी येतील.
काहीही झाले तरी, दयाळू राहा. लोक नेहमीच तुझ्याशी चांगले वागू शकणार नाहीत. त्यामुळे तुझ्याकडे दयाळू राहण्याचा पर्याय आहे. यामुळे तू आनंदी राहशील.
कठोर परिश्रम कर. तुला कधीही कठोर परिश्रम करण्याचा पश्चात्ताप होणार नाही. हो, तू थकशील, पण तुला कधीही कटुता किंवा राग येणार नाही.
संतुलन शोध. यासाठी कोणतेही सूत्र नाही. तुला काम, नातेसंबंध आणि स्वतःचे समीकरण तयार करावे लागेल. पण लक्षात ठेव की, संतुलन ही चैन नाही. ती एक गरज आहे.
लक्षात ठेव की आनंद हा एक प्रवास आहे, डेस्टिनेशन नाही. तुमचा आनंद पुढे ढकलू नको. प्रत्येक क्षण जग. जीवनातील छोट्या आनंदांचे कौतुक करण्यासाठी वेळ काढ.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.तू तुझ्या आयुष्याचा हा नवीन अध्याय सुरू करताना, मला तुला याची जाणीव करून द्यायची आहे की, तू कधीही एकटी नसशील. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन.