एका देशाचा दुसऱ्या देशावर असणारा प्रभाव कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान आणि चीन हे दोन देश.या दोन देशांमध्ये सध्या अत्यंत मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध आहेत. भारताला त्रास देण्यासाठी या दोन देशांनी चंग बांधला आहे. मात्र असं असलं तरीही चीननं तयार केलेली ब्लू प्रिंट पाकिस्तानच्या अडचणी वाढवू शकते. मात्र पाकिस्तान भारताला त्रास देण्यासाठी अक्षरशः चीनचे पाय चाटायलाही तयार झाला आहे असंच सद्यस्थिती सांगते आहे.

‘आज तक’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार चीननं पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून एक ब्लू प्रिंट तयार केली आहे जी मान्य झाल्यास हळूहळू पाकिस्तान चीनचा गुलाम होणार हे उघड आहे. या ब्लू प्रिंटनुसार पाकिस्तानच्या साधनसंपत्तीवर चीनचं नियंत्रण येणार आहे. भारताला अडचणीत आणण्यासाठी आता पाकिस्तान चीनची गुलामीही करायला तयार आहे असं दिसून येतं आहे.

चीननं अत्यंत पद्धतशीरपणे पाकिस्तानला अधिपत्याखाली आणण्याची योजना आखली आहे. इतकंच नाही तर भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी हे दोन्ही देश सज्ज झाले आहेत. असं असलं तरीही या ब्लू प्रिंटमुळे पाकिस्तानला चीनचा गुलाम व्हावं लागणार आहे हे उघड आहे.

काय आहे चीनच्या ब्लू प्रिंटमध्ये?

पाकिस्तानने त्यांची ६ हजार ५०० एकर जमीन चीनला भाडे तत्त्वावर द्यायची आहे

या जमिनीवर चीनमधील कंपन्या शेती करतील आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणतील

३५ अरब डॉलरची गुंतवणूक करून १७ पॉवर प्रोजेक्ट तयार करण्याची घोषणा झाली आहे

चीनमधला कापड उद्योग पाकिस्तानमध्ये आणला जाणार

बलुचिस्तान आणि खैबर या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणींवरही चीनची नजर

पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांना व्हिसा लागणार नाही

पाकिस्तानी शहरांवर चीनच्या तांत्रिक यंत्रणेची नजर राहणार

चीननं मांडलेल्या ब्लू प्रिंटमधले हे मुद्दे सध्या समोर आले आहेत, अशा अटी जर असतील तर निश्चितच पाकिस्तान स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो आहे यात शंका नाहीये. भारताचं नुकसान करून घेण्यासाठी पाकिस्तानला एवढी लाचारी पत्करणंही मंजूर दिसतं आहे. त्यामुळे येत्या काळात जर पाकिस्तानवर चीननं कब्जा केला तर आश्चर्य वाटायला नको.