चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संसेदत करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळांवर भारतीय प्रवाशांची चाचणी सुरु करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची आम्ही आरटी-पीसीआर चाचणी करत आहोत. आम्ही करोनाला रोखण्यासाठी कटिबद्ध असून, योग्य पावलं उचलत आहोत,” असं आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं.

यासह जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्री मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. जेणेकरुन चीनमध्ये रुग्णवाढीस कारणीभूत ठरणाऱ्या BF.7 सारख्या उपप्रकारांची माहिती मिळू शकेल.

Covid Variant BF.7: चीनमध्ये करोनाचं थैमान! भारतात नव्या व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळल्याने चिंता; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

“आम्ही जागतिक स्तरावर करोनाची काय स्थिती आहे यावर लक्ष ठेवून आहोत. त्यानुसारच आम्ही पावलं उचलत आहोत. करोनाच्या नव्या उपप्रकारांची माहिती मिळवण्यासाठी राज्यांना जनुक्रीय क्रमनिर्धारण करण्यास सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती मनसुख मांडविया यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. राज्यांना मास्कसक्ती, सॅनिटायजरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आल्याचंही ते म्हणाले आहेत.

Covid 19: …तर २० लाख लोकांचा मृत्यू होईल, चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना रिपोर्टमधून धक्कादायक माहिती

चीन, ब्राझील, जपान आणि इतर देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्व राज्यांसाठी नियमावली जारी करण्याची शक्यता आहे. “करोनाला रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालय सक्रीयपणे काम करत आहे. करोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक मदत दिली आहे. आतापर्यंत लसीचे २२० कोटी डोस देण्यात आले आहेत”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China covid outbreak union health minister mansukh mandaviya briefed parliament sgy
First published on: 22-12-2022 at 15:52 IST