पीटीआय, ओटावा

कॅनडामध्ये ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराबाहेर रविवारी खलिस्तानी निदर्शक आणि हिंदू धर्मीयांमध्ये संघर्ष उडाला. भारताच्या उच्चायुक्तालयाने हिंदू सभा मंदिराबरोबर संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. भारतीय उच्चायुक्तालय तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या घटनेचा निषेध केला असून परराष्ट्र मंत्रालयानेही दखल घेतली आहे.

ओटावा उच्चायुक्तालय आणि व्हॅनकूव्हर, टोरांटो येथील महावाणिज्य दूतावासांनी संयुक्तपणे छावणी उभारली होती. ‘लोकल लाइफ सर्टिफिकेट’ लाभार्थ्यांच्या सोयीसाठी हिंदू सभा मंदिराबरोबर एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या वेळी नियोजित हिंसक कृती करण्यात आल्याचा आरोप उच्चायुक्तालयाने केला.गोंधळानंतरही उच्चायुक्तालयाने एक हजाराहून अधिक लोकल लाइफ सर्टिफिकेट भारत आणि कॅनडामधील नागरिकांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. समाजमाध्यमांत खलिस्तानला समर्थन देणारे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. त्यांची पडताळणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>>Sisamau Bypolls 2024: कानपूरमध्ये सपा उमेदवाराने मंदिरात पूजा केल्याने राजकीय वाद; नसीम सोलंकी यांच्याविरोधात काढला फतवा

ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील हिंसेची कृती स्वीकारार्ह नाही. कॅनडातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा हक्क आहे. या घटनेनंतर समुदायाच्या रक्षणासाठी जलद कृती केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक आहे.-जस्टिन ट्रूडो, पंतप्रधान, कॅनडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा कृत्यांमुळे भारताच्या संकल्पांमध्ये कधीही कमकुवतपणा येणार नाही. आजच्या या प्रकाराबाबत कॅनडा सरकारने न्याय देण्याची अपेक्षा आहे. तसेच तेथे कायद्याचे राज्य असावे, ही देखील अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी</strong>पंतप्रधान