नवी दिल्ली : अहमदशहा अब्दालीसारख्या अफगाणी आक्रमकांविरोधात उत्तर भारतातील राजांनी मराठ्यांना मदत केली असती तर भारतावर आक्रमण करण्याची हिंमत कोणी केली नसती. या देशाचा इतिहासही वेगळा झाला असता, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पानिपतमध्ये ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत येथील ‘काला आम’ परिसरात मंगळवारी मराठा शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

हेही वाचा >>> अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान

पानिपतमध्ये मराठा योद्ध्यांच्या स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. शिवाय, या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभा केला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले. पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती फडणवीस यांना केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढण्याची शिकवण

अनेक मोहिमा मराठ्यांनी जिंकल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती पातीपलीकडे जाऊन देशासाठी लढण्याची शिकवण महाराष्ट्राला दिली होती. मराठ्यांनी त्याचे पालन केल्यामुळे दिल्लीचे तख्त त्यांना राखता आले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया, असेही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.