अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ओबामा यांचे म्हणणे ऐकून संघपरिवार, सरसंघचालक मोहन भागवत यांना धर्माच्या आधारावरील धर्मातराचे समर्थन करणे थांबविण्यास मोदी सांगणार का, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला.भारतीय घटनेतील २५व्या अनुच्छेदाचे ओबामा यांनी आपल्याला स्मरण करून दिले आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे नमूद करून ओबामा यांनी भारतीय नागरिकांच्या हक्कांबद्दल भाष्य केल्याबद्दल दिग्विजय सिंह यांनी त्यांचे आभार मानले.
मोदी हे आपले मित्र ओबामा यांचा सल्ला ऐकून विश्व हिंदू परिषद आणि मोहन भागवत यांना घरवापसी कार्यक्रमाचे समर्थन करणे थांबविण्यास सांगतील का, असा सवालही दिग्विजय सिंह यांनी केला
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2015 रोजी प्रकाशित
मोदींना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसकडून बराक ओबामांच्या विधानाचा आधार
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
First published on: 28-01-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress target modi for taking support of obama statement