गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील कोविड बाधितांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही भागांमध्ये सहव्याधींनी ग्रस्त असणाऱ्या कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत असून कोविड काळाप्रमाणेच आताही दररोजची कोविड बाधितांची व मृतांची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर केली जात आहे. यासंदर्भात गुरुवारच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने कोणत्या राज्यात किती कोविडबाधित व मृतांची संख्या आहे, याची सविस्तर यादी संकेतस्थळावर दिली आहे.
कोणत्या राज्यात किती कोविडबाधित?
राज्य | बाधितांची संख्या |
आंध्र प्रदेश | ५० |
अरुणाचल प्रदेश | ० |
आसाम | ८ |
बिहार | ३१ |
छत्तीसगड | १९ |
गोवा | ८ |
गुजरात | ५०८ |
हरियाणा | ६३ |
हिमाचल प्रदेश | १ |
झारखंड | ८ |
कर्नाटक | ४३६ |
केरळ | १४८७ |
मध्य प्रदेश | ३० |
महाराष्ट्र | ५२६ |
मणिपूर | ० |
मेघालय | ० |
मिझोराम | १ |
नागालँड | ० |
ओडिशा | १८ |
पंजाब | १६ |
राजस्थान | १०३ |
सिक्कीम | ९ |
तमिळनाडू | २१३ |
तेलंगणा | ३ |
त्रिपुरा | ० |
उत्तर प्रदेश | १९८ |
उत्तराखंड | ६ |
पश्चिम बंगाल | ५३८ |
महाराष्ट्रात सर्वाधिक करोना मृत्यू
दरम्यान, सध्या सर्वाधिक १४८७ करोनाबाधित केरळमध्ये आढळले असून त्याखालोखाल कर्नाटकमध्ये सध्या करोनाबाधितांचा आकडा ५३८ इतका आहे. महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या करोनाबाधितांचा आकडा ५२६ आहे. पण राज्यात आत्तापर्यंत सहव्याधीग्रस्त तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यात ७६ वर्षांच्या दोन तर ७९ वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. दिल्लीत मृतांचा आकडा २ असून त्यात ८७ वर्षीय व्यक्तीसोबत एका ५ वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे. कर्नाटकमध्येदेखी अनुक्रमे ६५ व ४२ वर्षीय करोनाबाधितांचा मृ्त्यू झाला आहे.