करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या १००४ झाली आहे. आतापर्यंत यापैकी २४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. देशभरातील करोना बळींची संख्या आता २४ झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक करोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे. करोना विषाणू संदर्भातील प्रत्येक बातमी इथं पाहणार आहोत…
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2020 रोजी प्रकाशित
Highlight : करोना बाधितांसाठी अदानी फाऊंडेशनकडून १०० कोटींची मदत
महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक करोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 29-03-2020 at 07:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus latest news update india lockdown positive cases deaths in world the total number of covid 19 cases in india coronavirus live updates
करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस देशात वाढतच आहे. महाराष्ट्र याबाबतीत अव्वल आहे. त्यात मुंबई खालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागत आहे. रविवारी (29 मार्च) दिवसभरात शहरात करोनाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले असून पुण्याची करोना बाधित रुग्णांची संख्या आता 28 झाली आहे.
देशातील सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांचं मोठ्या शहरांमधून गावांकडे स्थलांतर होऊ लागलं आहे. दरम्यान, त्यांच्याकडील संपर्काचे एकमेव साधन असलेल्या मोबाईलमधील बॅलन्सही संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत कॉलिंगची सुविधा द्यावी, अशी मागणी काँग्रेसने मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडे केली आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी अदानी फाऊंडेशनकडून मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान सहायता कोशात फाऊंडेशनकडून शंभर कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी यांची ट्विट करून माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 196 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ०३, रत्नागिरी ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३, मिरज २५, सातारा ०२, सिंधुदुर्ग ०१, कोल्हापूर ०१, जळगाव ०१, बुलढाणा ०१ अशी रुग्णांची संख्या आहे. तर मुंबई १४, पुणे १५, नागपूर ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३ असे एकूण ३४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५५ रुग्णालयात आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून तो रोखण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. भारतात इतर देशांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा सरकारनं वेगळी पावलं उचलायला हवीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या संकटसमयी आम्ही सरकारच्यासोबत आहोत. सरकारसोबत राहून आम्ही या आव्हानाचा सामना करु, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
२१ दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे पुण्यातील नौरोस जी वाडिया महाविद्यालय मार्फत इयत्ता ८, ९ आणि १०वी साठी घेण्यात येणारी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. नक्की केंव्हा होईल हे नंतर सांगण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात कर्फ्यु जाहीर केला आहे. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील कोणतेही कामकाज करता येणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १९६ वर पोहचली आहे. मुंबई आणि उपनगर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर १३, रत्नागिगीर १, औरंगाबाद १, सातारा २, यवतमाळ ३, मिरज २५, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १ आणि बुलढाना १.
देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून स्टील उद्योग श्रेत्रातील आघाडीची कंपनी JSW ग्रुपनं मदतीचा हात पुढे केला आहे. सविस्तार वाचा
करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले आणखी तीन रुग्ण नागपूरमध्ये आज (रविवार) आढळून आले आहेत. तसेच बुलडाण्यात देखील एक रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे विदर्भात एकाच दिवसात नव्याने ४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागपूरातील करोनाबाधितांची संख्या १४वर पोहोचली आहे.
घराबाहेर पडू नका. घराबाहेर मोठं संकट आहे. पण, त्यामुळे चेहरा पाडून बसू नका. घरात आनंदी राहा, कुटुंबाला आनंदी ठेवा. बाहेर पडाल तर आभाळ कोसळेल. त्यामुळे घरीच राहा, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
राज्यभरात शिवभोजन थाळी जेथे सुरू आहे तेथे गर्दी होत आहे. पण, आम्ही तेथील हॉटेल मालकांच्या संपर्कात आहोत. तेथील गर्दीचं व्यवस्थापन करा. जेवताना अंतर ठेवा, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांची व्यवस्था कशी करता येईल, याबाबत आम्ही विचार करतो आहोत. तेथील राज्य सरकारे संपर्कात आहेत. त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे चिंता करू नका, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
करोना नावाच्या संकटाच्या मागे आपल्याला हात धुवून लागायचं आहे, त्यामुळे नेहमी हात धुवत राहा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
करोना नावाच्या संकटाच्या मागे आपल्याला हात धुवून लागायचं आहे, त्यामुळे नेहमी हात धुवत राहा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दिवसेंदिवस करोनाचा भारतातील प्रदुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. या महामारीवर सध्या तरी कोणताच उपाचार नाही. पण ही माहामारी पसरू नये म्हणून केंद्र सरकारकडून योग्य ते उपाय केले जात आहेत...सविस्तर वाचा
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने माल वाहतुकीवर याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या औषधनिर्मिती क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता या कंपन्यांनी वर्तवली आहे. सविस्तर बातमी वाचा...
१५० किमीचे अंतर पायीच चालण्याचा निर्धार करत काल रात्रीच निघालेल्या बालाघाटी मजुरांची समजूत घालून त्यांना धर्मशाळेत थांबवण्यात सामाजिक कार्यकर्त्यांना यश आलं आहे. शनिवारी रात्री ही घडामोड झाली. बांधकामासाठी येथे आलेल्या साठ बालाघाटी मजूर कुटुंबांपैकी वीस कुटुंबांनी रात्रीच परतीच्या प्रवासाला जायचा निर्णय घेतला आणि प्रवास सुरुही केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानामागून ते पुढे गेले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बजाज यांच्या निदर्शनास ही बाब आली. स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवून असणारे सचिन अग्निहोत्री यांना कळविण्यात आले.
मुंबईत रविवारी करोनानं आणखी एक बळी घेतला. करोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेला करोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यानंतर करोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, करोनामुळे मुंबईत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
करोना व्हायरसचा कहर जगभरात वाढतो आहे आणि जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. आता त्यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे. स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या.
मध्यप्रदेशातील एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करोना लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या ५० इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत
नाशिक येथील शेतकऱ्यानं एकरातील गहू करोनाच्या मदतीसाठी दान केले आहेत. दत्ताराम पाटील असे त्या शेतकऱ्याचं नाव आहे. माझ्याकडे पैसे नाहीत पण एक भाकरीतील आर्धी भाकरी भूकेल्याला द्यायची आपली संस्कृती आहे. त्यानुसार मी माझ्या शेतातील गहू दान करत आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याआधीपासूनच देशामध्ये कंडोमचा खप ५० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त समोर आलेलं असतानाच जागतिक स्तरावर कंडोमची कमतरता भासू शकते अशी भीती आता जगातील सर्वात मोठ्या कंडोम निर्माता कंपनीने व्यक्त केली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
काश्मीरमधील करोना बाधितांच्या संखेत वाढ झाली आहे. रविवारी काश्मीरमध्ये पाच नवे रूग्ण मिळाले आहेत. यापैकी दोन श्रीनगर, दोन बुधेगम आणि एक बारामुला येथील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मोदींनी करोनावर मात करणाऱ्या दोन रुग्णांशी गप्पा मारल्या. हैदराबादमधील रामगप्पा तेजा आणि आग्रा येथील अशोक कपूर हे दोन्ही रुग्ण करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी कपूर कुटुंबातील चक्क सहा जणांना करोनाची लागण झाली होती. मात्र पूर्ण उपचारानंतर हे सहाही जण घरी परतले आहेत असं अशोक कपूर यांनी सांगितलं. येथे वाचा कपूर कुटुंबाची संघर्षकथा
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे...वाचा सविस्तर
नागपूरमध्ये जरीपटका येथील शनिवारी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेला रूग्ण दिल्लीहून परतलेल्या एका करोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आता त्याच्या ११ वर्षांच्या मुलीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
देशात सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळं कठीण परिस्थिती बनली आहे. मात्र, जे लोक परदेशातून आले आहेत किंवा जे लोक अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यांच्याशी लोक चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहत आहेत. ही बाब चुकीची असून सध्याच्या घडीला आपल्यासाठी सोशल डिस्टंसिंग गरजेचं असलं तरी इमोशनल डिस्टंसिंगही कमी करायला हवं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'द्वारे केली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत जाते. जगातील इतर देशांचा सुरू असलेला करोनाचा लढा आपण पाहतोय. आपण आपलं स्वास्थ जपून जगाला दाखवून देऊयात. मित्रांनो आपल्याकडे आपले अनेक सहकारी संपूर्ण देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत
करोना बाधित अथवा संशयितासोबत लोक भेदभाव करत आहेत. असा भेदभाव करू नका. आपल्याला सोशल डिस्टेसिंग ठेवायचेय पण इमोशनल डिस्टेन कमी करायचाय
या संकटाच्या काळात गरिबांना आपण मदत केली पाहिजे. हीच आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.
पथ्य आणि योग्य उपचारानं करोनावर मात करता येणं शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर मात करणाऱ्यांशी संवाद साधला आहे. करोना व्हायरस पीडित रामगप्पा तेजा यांनी करोनावर मात केलीय. त्यांनी आपला अनुभव पंतप्रधान मोदींसमोर यावेळी कथन केला.
भारतामध्ये करोनाचा प्रदुर्भाव पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतो. यावर अद्याप कोणतेही औषध उपलबद्ध आहे. लॉकडाउनचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य करावे. डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफपासून प्रेरणा घ्या आणि इतरांना मदत करा असं अवाहन मोदी यांनी केलं.
करोना विषाणूनं सगळ्या जगालाच विळखा घातला आहे. या महामाराशी लढाई म्हणजे जीवन मरणाशी लढाई आहे.
करोना विषाणूनं सगळ्या जगालाच विळखा घातला आहे. या महामाराशी लढाई म्हणजे जीवन मरणाशी लढाई आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हे निर्णय घ्यावे लागले आहेत. ही व्हायरसविरोधातली लढाई आहे. त्यामुळे लॉकडाउन पुकारावा लागला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाची माफी मागितली....सविस्तार वाचा
लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात होत असलेल्या असुवेधबद्दल मी जनतेची माफी मागतो
करोना विरुद्ध लढा देणं आपल्यापुढं मोठं आव्हान आहे. त्यासाठी प्रसंगी काही ठोस आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील. तरच सर्वजण सुखरुप राहतील - मोदी
करोनाचा वाढता प्रदुर्भावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केलेत. या क्रमांकावर फोन करून नागरिक आपल्या प्रश्नांवर सरकारकडून मदत घेऊ शकतील. महाराष्ट्रातील नागरिक ०२२ - २२०२२७९९० या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकतील