करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत गेल्या २४ तासात विक्रमी वाढ झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३ हजारांच्या पलीकडे गेला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत चालली आहे. रविवारी रात्री ९ वाजता देशातील जनतेने ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे, मोबाइल फ्लॅशलाइट्स लावावे असे आवाहन मोदी यांनी केले होते. त्याला देशवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. रात्री नऊनंतर काही वेळासाठी जनतेने घरातील लाइट्स बंद ठेवले होते. मात्र काही ठिकाणी काही जण रस्त्यावर एकत्र येऊन फटाके फोडतानाही दिसले.

देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घरातील वीज बंद केली. रविवारी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी पणतीचं प्रज्वलन करत मोदींच्या आवाहनाला पाठींबा दर्शवला.
अभिनेता अक्षय कुमार याने रात्री ९ वाजता दिवा पेटवून करोनाविरोधातील लढ्यात आपला सहभाग नोंदवला. आपण एकत्र येऊन या संकटातून बाहेर पडू असं टि्वट अक्षयनं केलं आहे.
मोदींच्या आवाहनानंतर भारतरत्न लता मंगेशकरही सहभागी झाल्या आहेत. घरासमोर दीप प्रज्वलीत करत लता मंगेशकरांनी करोनाच्या लढातील आपली भूमिका स्पष्ट केली नमस्कार.
माननीय प्रधानमंत्री नरेन्द्रभाई मोदी जी के आवाहन पर आओ सब मिलकर दिया जलाए.. @narendramodi https://t.co/ZQpTLMLsx9 pic.twitter.com/ayoqaksIkR — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 5, 2020
मोदींच्या आवाहनानंतर भारतरत्न लता मंगेशकरही सहभागी झाल्या आहेत. घरासमोर दीप प्रज्वलीत करत लता मंगेशकरांनी करोनाच्या लढातील आपली भूमिका स्पष्ट केली नमस्कार.
माननीय प्रधानमंत्री नरेन्द्रभाई मोदी जी के आवाहन पर आओ सब मिलकर दिया जलाए.. @narendramodi https://t.co/ZQpTLMLsx9 pic.twitter.com/ayoqaksIkR — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 5, 2020
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घरातील वीज बंद करत मेनबत्ती प्रज्वलीत करून मोदींच्या आवाहनाला पाठींबा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनााला साद देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही राष्ट्रपती भवनात दिवे पेटवले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या.
करोना व्हायरसच्या विरोधात देश एकवटला आहे. देशातील कलाकार, व्यावसायिक आणि नागरिकांनी मेनबत्ती, दिवे लावून मोदींच्या आवाहनाला पाठींबा दिला आहे. यावेळी अनेक ठिकाणी गो करोना गो च्या घोषणा देण्यात आल्या
मेनबत्ती लावून शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीय मोदींच्या आजच्या आवहानात पाठींबा दिला
गो करोना गो अस ट्विट करत तापसीनं मोदींच्या आजच्या आवाहानाला टोमना लगावला आहे
राज्यातील करोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ४५ झाली आहे. आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ८, पुणे ३, कल्याण, डोंबवली आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ झाली आहे. आतापर्यंत ५६ जण करोनाच्या कचाट्यातून वाचले असून त्यांना डिसचार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागनं दिली आहे.
जयपुरमध्ये रामगंजमधील एका परिसरामध्ये ३९ जण करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. रामगंजमधील एकून करोना रूग्णांची संख्या ७४ झाली आहे. नवीन ३९ जणांमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
करोना व्हायरस महामारीने जगभरात ६० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांपेक्षा जास्त नागरिक करोना व्हायरसच्या चपाट्यात आले आहेत. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. करोना व्हायरसवर लस किंवा औषध शोधण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. अशांतच ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी करोना व्हायरसवर औषध मिळाल्याचा दावा केला आहे. अवघ्या ४८ तासांत खात्मा केला जाईल असंही आपल्या दाव्यात त्यांनी म्हटलेय.
देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली होती. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.
देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज (५ एप्रिल) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आव्हान केलं आहे. मोदी यांच्या या आवाहनावरून नेटकरी आणि विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. विरोधकांच्या या टीकेला राज्यातील भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पाच मुद्दे मांडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेताजी बोस, बाबासाहेब आंबेडकर आणि रामदास स्वामी यांच्या काही घोषणांचा आढावा दिलाय….
जगभरात करोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेनंही या रोगापुढं पाय टेकवलं आहेत. अमेरिकेत तीन लाखांहून अधिक जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे तर आठ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्याधर्तीवरच शनिवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोन चर्चा झाली…वाचा सविस्तर
अचानक करोनाचा उपद्रव वाढल्यानं राज्य आणि केंद्र सरकारनं शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनंही केंद्रीय मनुष्य बळ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. लॉकडाउन असल्यानं शाळा महाविद्यालये बंद आहेत. १४ एप्रिलला लॉकडाउन संपणार आहे. मात्र, शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच घेण्यात येणार आहे. देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘पीटीआय’ला ही माहिती दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र यामध्ये अव्वल स्थानावर आहे. सद्यस्थितीस महाराष्ट्रात 690 जणांना करोनाची बाधा झालेली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज (५ एप्रिल) रात्री नऊ वाजता घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आव्हान केलं आहे. मोदी यांच्या या आवाहनावरून विरोधकांनी टीका केली. देशातील परिस्थिती गंभीर असताना दिवे कशासाठी लावायचे असंही काही नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले असून, त्याचं उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे. ‘राष्ट्रीय आपत्तीला ईव्हेंट स्वरूप देण हे खूप लज्जास्पद आहे. त्यापेक्षाही जास्त अपमानास्पद बाब म्हणजे जागतिक आपत्ती ओढवलेली असताना त्याआडून स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवणं. पंतप्रधान हे समजून घेतील,’ अशी सडकून टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचे आदेश दिलेले आहेत. त्यात आता नोएडामध्ये 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू असणार आहे. यानुसार आता मोर्चे, धरणे आंदोलन व अन्य बाबींवर पुर्णपणे बंदी असणार आहे. पोलीस आयुक्त आशुतोष द्विदेदी यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
करोनामुळे पुण्यात 24 तासांत तीन जणांना प्राण गमावावे लागले आहेत. मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे.
लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्र ठप्प आहेत. कारखाने आणि रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग बंद असल्यानं नद्याच्या पाण्याची गुणवत्तेत सुधारणा दिसू लागली आहे. नद्यांच पाणी नितळ होऊ लागलं असून, गंगा नदीपाठोपाठ यमुनेच्या पाण्यातही हा फरक दिसून आला आहे.
गुजरात राज्यातील पोरबंदर, वेरावळ इत्यादी भागात मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या सुमारे एक हजार नागरिकांना दक्षिण गुजरात मधील स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र, गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नागोळ व उमरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खलाशांना घेऊन आलेल्या तेवीस बोटी नागोळ जवळ खाडीमध्ये नांगरण्यात आल्या असून या २३ बोटींमधील खलाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गुजरात शासनाने व्यवस्था केली आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आतापर्यंत जगात हजारोंच्या संख्येने करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्येच अनेक देशांमध्ये लॉकडाउन केल्यामुळे त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे.या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सर्व कामकाज बंद आहे. या बंदच्या दरम्यान हातावर पोट असलेल्या कामगारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सने या मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पुढे वाचा…
गुजरात राज्यातील पोरबंदर, वेरावळ इत्यादी भागात मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या सुमारे एक हजार नागरिकांना दक्षिण गुजरातमधील स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र, गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नागोळ व उमरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण घरात बसले आहेत. पण काही जण असे आहेत जे लॉकडाउन असूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. यामध्ये एका अभिनेत्रीचादेखील समावेश आहे. बाहेर फिरायला निघालेल्या या अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला आहे. वाचा सविस्तर…
वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे संताप व्यक्त होत आहे. उपक्रम राबविण्यात तत्पर म्हणून ओळख असणाऱ्या आमदार केचे यांचा आजचा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे. सविस्तर वृत्त वाचा
देशात दिवसेंदिवस करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. काही दिवसापूर्वी मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या इमारतीत करोनाग्रस्त व्यक्ती आढळून आली होती.त्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये करोनाग्रस्त व्यक्ती आढळली आहे. त्यामुळे सध्या खबरदारीचा उपाय म्हणून आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी हा भाग सील करण्यात आला आहे. पुढे वाचा…
महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही संख्या ६६१ वर गेली. पिंपरी चिंचवडमध्ये १७ नवे रूग्ण आढळले आहेत. पुण्यात ४, अहमदनगरमध्ये ३ तर औरंगबादेत नवे २ रुग्ण आढळले आहेत. अद्याप मुंबईची रविवारची आकडेवारी समोर आली नाही.
सूरतमध्ये रविवारी ६१ वर्षीय करोना रुग्णाचा बळी गेला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे. गुजरातमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत रविवारी १४ जणांची भर पडली. त्यामुळे तेथील एकूण करोना बाधितांची संख्या १२२ झाली आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी दोन बळी गेले आहेत. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे आणखी एक बळी गेला आहे. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दाखल केल्यानंतर महिलेची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, काही दिवसांपूर्वी केलेल्या चाचणीत रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली.A 60-year-old woman, who was brought dead at Pune’s Sassoon Hospital on April 3, has been found #COVID19 positive. She had earlier tested negative: Sassoon Hospital officials in Maharashtra— ANI (@ANI) April 5, 2020
देशातील करोनाची परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या साठी सर्व पक्षांचे संसदेतील नेते उपस्थित राहतील. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे देशात २१ दिवसांसाठी सारं काही बंद आहे. मात्र हा लॉकडाउनचा काळ संपल्यानंतर सिनेमागृहांची साखळी चालविणाऱ्या पीव्हीआर कंपनीने चित्रपटगृहांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनजीवन सुरळीत सुरु झालं तरीदेखील पीव्हीआर त्यांच्या चित्रपटगृहांमध्ये सोशल डिस्टंसिंग ( social distancing) पाळणार आहेत. पुढे वाचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील विजेवरील प्रकाश दिवे बंद करून दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करून याबद्दल आवाहन केलं आहे. हे करत असताना सोशल डिस्टन्सिग पाळा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद ठेवून दिवे लावणे, बॅटरी सुरू करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पण, हे करत असताना दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर केल्यास ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. सविस्तर वृत्त येथे वाचा…
दिल्लीत तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील तीन जणांचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता आठवर गेली आहे.
गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शनिवारी तिचा हा रिपोर्ट आला. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सविस्तर वाचा…
भारतात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.