देशामधील करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील जनतेशी संवाद साधला होता. आज मोदी काय घोषणा करणार याकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून राहिलेलं आहे. मोदी काय बोलणार यासंदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता मोदी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा करु शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायलयातील वकील आणि स्पंद या सेवाभावी संस्थेचे संस्थापक तसेच लेखक असणाऱ्या प्रशांत पटेल उमराव यांनी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उमराव यांनी यासंदर्भातील शक्यता वर्तवणारे ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी कलम ३६० चा उल्लेख केला आहे. “नरेंद्र मोदी देशामध्ये कलम ३६० अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक स्थिरतेला किंवा भारताची राष्ट्रीय पत कमी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम ३६० नुसार जर देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करु शकतात,” असं उमराव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणीबाणी म्हणजे काय?

देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत या मूलभूत अधिकारांवर अधिक कठोर मर्यादा आणल्या जातात. घटनात्मक तरतुदींचा वापर करून कायद्याचा वापर करून या मुलभूत अधिकारांवर काही ठराविक काळासाठी मर्यादा घातल्या जातात त्याला आणीबाणी असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pm modi likely to declare a financial emergency in bharat under article 360 tweet prashant umrao scsg
First published on: 24-03-2020 at 13:56 IST