Loksabha Election 2024 : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पण, लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासंबंधी एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गडकरी पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हणताना दिसत आहेत. तसेच भ्रष्टाचारी राजकारणी आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचेही ते या व्हिडीओत म्हणताना दिसतात. त्यातून त्यांनी लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचा दावा केला जात आहे. पण, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि त्यातील दावा सत्य आहे की असत्य ते जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर Abha Chaudhary ने व्हिडीओ आपल्या प्रोफाईलवरून शेअर केला.
या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन येथे बघा.
इतर युजर्सनीही अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर केला आहे.
तपास:
आम्ही व्हिडीओचा कमेंट्स सेक्शन तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक युजर्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये व्हिडीओ जुना असल्याचे लिहिले होते.
रिव्हर्स इमेज सर्चने आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला; पण कोणतेही परिणाम न मिळाल्याने, आम्ही नंतर गूगल कीवर्डनुसार शोध घेतला.
कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.
हा व्हिडीओ १२ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओचे शीर्षक होते, BJP Byte : Anna Hazare & Prime Minister जो १५ ऑगस्ट २०११ मध्ये पोस्ट करण्यात आला होता. २०११ मध्ये डॉ. मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते.
आम्हाला गडकरींच्या या वक्तव्यासंदर्भातील काही बातम्यादेखील सापडल्या.
निष्कर्ष :
व्हायरल व्हिडीओ १५ ऑगस्ट २०११ चा आहे. जेव्हा नितीन गडकरी यांनी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरही टीका केली होती. तोच जुना व्हिडीओ २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे व्हायरल होणारा हा दावा बनावट आहे. तपासादरम्यान हा व्हिडीओ १२ वर्षांपूर्वीचा जुना असल्याचे आढळून आले.