पीटीआय, धर्मशाळा (हिमाचल प्रदेश)
दलाई लामा हे पद यापुढेही सुरूच राहणार असून ‘गेडन फोड्रंग ट्रस्ट’कडेच आपला उत्तराधिकारी ठरविण्याचा अधिकार आहे. यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांनी स्पष्ट केले. यासह त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी असेल की नाही यावरील अनिश्चिततेचा अंत झाला.
दलाई लामा यांनी ‘गेडन फोड्रंग ट्रस्ट’ या ट्रस्टची २०१५मध्ये स्थापना केली होती. १४ वे दलाई लामा – तेन्झिन ग्यात्सो, ज्यांना ल्हामा थोंडुप म्हणूनही ओळखले जाते; त्यांनी तिबेटची सर्वात पवित्र परंपरा रद्द केली जाऊ शकते किंवा त्यांचा उत्तराधिकारी महिला किंवा चीनबाहेर जन्मलेली व्यक्ती असू शकते असे विधान २१ मे २०२५ रोजी केले होते. तिबेटी भाषेतील त्यांच्या भाषणाची ५.५७ मिनिटांची चित्रफीतदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती.
दलाई लामा पद यापुढेही सुरू ठेवावे अशी विनंती करणारे संदेश जगभरातील तिबेटी बौद्धांकडून विविध माध्यमांद्वारे मिळाले आहेत. पुनर्जन्म ओळखण्याची जबाबदारी ‘गादेन फोड्रंग’ ट्रस्टच्या सदस्यांवर आहे. – दलाई लामा, आध्यात्मिक धर्मगुरू