देश करोनाच्या संकटात अडकला असताना काळाबाजार आणि लूट करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात वैद्यकीय उपकरणं आणि औषधांचा तुटवडा असल्याने अनेक जण आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी चढ्या किंमती देत आहेत. नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेत अनेकांनी लूट चालवली आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन अशा बऱ्याच गोष्टी चढ्या किंमतीने विकल्या जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. गुरगाव ते लुधियानातील रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल १.२० लाख घेतले. हे अंतर ३५० किलोमीटर इतकं आहे. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाच्या मुसक्या आवळल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली सरकारनं शहरात खासगी रुग्णवाहिका सेवेसाठी बिल रक्कम निश्चित केली आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमांचं उल्लंघन करण्याऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. असं असूनही एका रुग्णाला गुरगावहून लुधियाना येथे नेण्यासाठी तब्बल १.२० लाख घेतले. सुरुवातीला आरोपी १.४० लाखांवरच अडून बसला होता. तिने ऑक्सिजन सिलेंडर असल्याचं सांगत अनेक विनवण्या केल्यानंतर त्याने २० हजार रुपये कमी केल्याचं रुग्णाच्या मुलीने सांगितलं.

याप्रकरणी पोलिसानी मिमोह कुमार बुंदवाल याला अटक केली आहे. हा पेशाने डॉक्टर असून गेल्या दोन वर्षांपासून रुग्णवाहीकेचा व्यवसाय करत आहे. त्याला दिल्लीच्या इंदरपुरी येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यांपासून हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

कोविड रुग्णालयांना दिलासा; दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास मूभा

पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने रुग्णाच्या नातेवाईकांचे पैसे परत केलेत. तसेच पोलिसांनी रुग्णवाहिका सेवा कंपनीच्या बँकेची माहिती घेतली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi ambulance charges 1 lakh 20 thousand for 350 km distance police arrest doctor rmt
First published on: 08-05-2021 at 15:45 IST