Crime News Delhi: दिल्लीतून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. गुटखा थुंकल्याबद्दल एका व्यक्तीला गोळी घालण्यात आली असून, ही घटना ईशान्य दिल्लीतील खजुरी खास परिसरात घडली आहे. याबाबत पोलिसांनी रविवारी माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर असे, कळले की गुटखा थुंकणारा पीडित आणि गोळीबार करणाऱ्या शेजाऱ्यामध्ये पूर्वी कोणताही वाद नव्हता.

दरम्यान पीडिताचे नाव आमिर असे असून, तो खजुरी खास येथील रहिवासी आहे. त्याच्या पाठीला गोळी लागली असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शेजाऱ्यांमध्ये गुटखा थुंकण्यावरून झालेल्या वादानंतर ही घटना घडली. दोन्ही पक्षांमध्ये पूर्वी कोणतेही वैर नव्हते, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पीडित आमिरने गुटखा थुंकल्यानंतर ही घटना घडली, ज्यामुळे त्याचा शेजारी संतापला. दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर वादात झाले. पोलिसांनी सांगितले की, या वादात एका व्यक्तीने देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळीबार केला ज्यामुळे आमिर जखमी झाला.

काही वेळातच पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर ते जखमी व्यक्तीला शोधण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमिरला जवळच्या रुग्णालयात नेले. यानंतर पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास केला आणि नंतर गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाशी संबंधित अमन (२०), त्याचे वडील इरफान (४०) आणि रेहान (१८) या तीन आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींपैकी एक अमनला अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले बंदुक जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.