Bihar Politics Nitish Kumar Updates : बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा वादळ निर्माण केले आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर ते एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. २०२० साली नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाने भाजपासह निवडणूक लढविली आणि निकालानंतर सत्ता स्थापन केली. मात्र २०२२ रोजी भाजपाशी अचानक काडीमोड घेत, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. आता दोनच वर्षात आरजेडीला सोडून नितीश कुमार पुन्हा भाजपाबरोबर जात आहेत. आरजेडीकडून तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यादव यांनी अद्याप नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली नसली तरी लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या नेहमीच नितीश कुमारांवर टीका करत असतात. आताही त्यांनी एक्स अकाऊंटवर टोला लगावणाऱ्या अनेक पोस्ट टाकल्या आहेत.

ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”
kumar vishwas on arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची सूचक पोस्ट; दोनच ओळींमध्ये मांडली भूमिका!

मागच्या आठवड्यात भाजपाने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे जाहीर कौतुक केले. तसेच मी समाजवादी विचारांचा असून घराणेशाहीला कधीही थारा दिला नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या टिप्पणीवर रोहिणी आचार्य यांनी आक्षेप घेत एक्सवर त्यांना चिमटा काढणारी पोस्ट टाकली. वाद उफाळल्यानंतर रोहिणी आचार्य आपली पोस्ट डिलीट केली असली तरी दोन्ही पक्षात ठिणगी पडली. आता पुन्हा एकदा रोहिणी आचार्य यांनी नितीश कुमारांना डिवचले आहे.

नितीश दुरावले, ममतांची नाराजी… ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के! विरोधक आता काय करणार?

काय म्हणाल्या रोहिणी आचार्य?

रोहिणी आचार्य यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले, “कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला. कचराकुंडी मंडळाला दुर्गंधीदायक कचरा लखलाभ…” या मजकुरासह रोहिणी आचार्य यांनी कचराकुंडीत करचा टाकतानाचा एक फोटोही जोडला आहे. त्याआधी त्यांनी आज पहाटेच एक आणखी पोस्ट टाकली. त्यात म्हटले की, जोपर्यंत श्वास चालू आहे, तोपर्यंत सांप्रदायिक शक्तींविरोधात आमची लढाई सुरूच राहील.

रोहिणी आचार्य यांनी आज आक्रमक पवित्रा घेत आपल्या एक्स अकाऊंटवर अनेक पोस्ट टाकल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी थेट नितीश कुमारांवर हल्लाबोल केला. एका पोस्टमध्ये त्यांनी हिंदीत म्हटले, “उसके साथ रहना बेकार है, जिसकी विचारधारा गिरगिट कुमार है..”

तसेच त्यांनी लालू प्रसाद यादव यांचे २०१७ साली केलेली एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यात लालू प्रसाद यादव यांनी म्हटले होते, “नितीश साप आहे. साप जशी कात टाकतो, तसे नितीश कुमारही कात सोडतात. सापाप्रमाणेच ते दर दोन वर्षांनी नवीन कात धारण करतात. कुणाला शंका आहे का?”

“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल

नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले असताना इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपाचा हात धरल्यामुळे इंडिया आघाडीच्या ऐक्यावरच घाव घातला गेला. त्यामुळे भाजपाने इंडिया आघाडीवर चांगलेच तोंडसुख घेतले. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र अभुतपूर्व कोंडी झाली. एका बाजूला तृणमूलच्या ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल नाराज असताना नितीश कुमार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.

नितीश कुमार यांनी आज सकाळी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सायंकाळी ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे कळते. रोहिणी आचार्य यांनी एक्सवर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वैदी यांनीही एक्सवर पोस्ट टाकून रोहिणी आचार्य यांच्या भावना समजून घेतल्या पाहीजेत, अशी पोस्ट टाकली.