पुरूषांचा वॉलीबॉल सामना बघण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून तुरूंगात डांबण्यात आलेल्या गोन्चे गवामी या ब्रिटिश-इराणी महिलेची जामीनावर सुटका करण्याची आल्याचे समजते. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्वस्थ असल्याच्या कारणावरून तिला जामीन देण्यात आला आहे. गोन्चे गवामी हिला पुरूषांचा वॉलीबॉल सामना पाहण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कारणावरून एका वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. इराणी हुकूमतीच्या विरोधात मुद्दाम षडयंत्र रचल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. इस्लामी रिपब्लिकच्या नियमांनुसार तेथील महिलांना पुरूषांचा खेळ पाहण्यास सक्त मनाई आहे.