गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईट बिअरसाठी प्रत्येक बाटलीमागे १५ रुपये तर स्ट्राँग बिअर २० ते २५ आणि प्रीमियम बिअर ३० रुपयांनी महाग होईल. गोव्यात बिअरला स्थानिकांकडून सर्वात जास्त मागणी असते. पर्यटक भारतीय बनावटीच्या परदेशी मद्याला पसंत देतात असंही त्यांनी सांगितलं आहे.

गोव्यातून महाराष्ट्रात दारु आणणाऱ्यांवर होणार कारवाई

गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे मकोकाअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना तस्करी करणाऱ्यांविरोधात एक प्रस्ताव तयार करत पोलीस प्रशासनाला पाठवण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन पोलिसांना मकोकाअंतर्गत कारवाई करता येईल.

शंभूराजे देसाई यांनी कोल्हापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी शेजारील कर्नाटक व गोवा राज्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी या मार्गांवर कडक तपासणी सुरु करा. यासाठी तात्पुरते चेक नाके उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यास मान्यता देण्यात येईल अशी माहिती दिली होती.

विश्लेषण : अती मद्यसेवनाचे प्रमाण किती? वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय होतोय परिणाम?

शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्यास सांगितलं आहे. गोवा आणि सिंधुदूर्ग जिल्हा जोडलेला आहे, मात्र असे अनेक मार्ग आहेत ज्यांचा रस्त्यांचा वापर करत कोल्हापूरलाही जाता येतं. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने या रस्त्यांवर तपासणी होत नाही.

गोव्यातील मद्य दुकानांचे मालक रस्तेमार्ग मद्य नेण्यासाठी अनेकदा ग्राहकांना व्हिजिटर्स परमिट देत असतात. पण हे परमिट काही राज्यं आणि केद्रशासित प्रदेशांमध्येच वैध आहे. महाराष्ट्रात या परमिटला काहीच आधार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कायद्यानुार. गोव्यातून महाराष्ट्रात दारुची एक बाटलीही आणली जाऊ शकत नाही. गोव्यातील मद्य दुकानांचे मालक नफा कमावण्याच्या हेतूनेच हे परिमट देत असतात असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa excise department to increase excise duty on beer sgy
First published on: 16-10-2022 at 12:29 IST