नवी दिल्लीमधील किडवाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एका ८ वर्षीय मुलाच्या गुप्तांगाला चक्क नायलॉनचा धागा बांधल्याची घटना घडली. या खोडसाळपणानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत असून हे कृत्य करणाऱ्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

नेमकं काय घडलं?

हेही वाचा >> उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या “नंगटपणा करणारी ही बाई…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किडवाई नगरातील दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी याच भागातील एका ८ वर्षीय मुलाच्या गुप्तांगाला नायलॉनचा धागा बांधला. मुलगा अंघोळ करत असताना ही बाब २८ डिसेंबर रोजी त्याच्या पालकांच्या लक्षात आली. त्यानंतर पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयाला भेट देत त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

हेही वाचा >> भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह! साताऱ्यात खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मुलाची प्रकृती सध्या स्थिर असून तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. उपचार सुरू असलेला अल्पवयीन मुलगा त्याच्याशी खोडसाळपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवू शकला नाही. त्यामळे पोलीस अधिक तपासासाठी किडवाई येथील पालिकेच्या शाळेला भेट देणार आहेत.