अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री येथील एका समलैंगिकांच्या नाईट क्लबमध्ये बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त ‘मिरर’ने दिलं आहे.

या गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून जखमींना नाईट क्लबमधून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका तैनात केल्याचं दिसत आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!

हेही वाचा- VIDEO: ४३ जणांना घेऊन जाणारं विमान तलावात कोसळलं; मृतांचा आकडा १९ वर, टांझानियातील भयावह घटना

खरं तर, ट्रान्सफोबियामुळे (समलैंगिक संबंध विकृत भावना आहे, असं मानणे) खून झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी अमेरिकेत ‘ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबरन्स’ हा दिवस साजरा केला जातो. रविवारी रात्री कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील ‘क्लब क्यू’मध्ये हा दिवस साजरा केला जात होता. यावेळी एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी घटनेची पुष्टी न करता दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर व्यक्तीने स्नायपर रायफलचा वापर करून या ‘गे क्लब’वर हल्ला केला. या हल्ल्यात किमान १० लोकांना गोळ्या घातल्या आहेत. आरोपीनं हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला आणि या घटनेत नेमके किती लोक जखमी झाले आहेत? याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही.