scorecardresearch

फेसबुक आणि यूट्यूबवर डोनाल्ड ट्रम्प यांचं दोन वर्षांनी पुनरागमन; बंदी उठवताच म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवर ३४ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर…

trump
फेसबुक आणि यूट्यूबवर डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन वर्षांनी पुनरागमन; बंदी उठवताच म्हणाले…

यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि यूट्यूब अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता शुक्रवारी ( १७ मार्च ) उठवण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि यूट्यूब अकाऊंटवर पुनरागमन झालं आहे. ही बंद उठवताच ट्रम्प पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत.

फेसबुकवर पहिली पोस्ट करत ‘मी पुन्हा आलोय’ असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच, २०१६ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतरचा भाषणातील एक व्हिडीओ फेसबुकवर त्यांनी शेअर केला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडीओत ट्रम्प म्हणातात, “तुम्हाला एवढी वाट पाहण्यास लावल्याबद्दल माफी मागतो.”

हेही वाचा : व्लादिमिर पुतिन यांना बजावलेल्या वॉरंटची रशियाच्या पूर्व राष्ट्राध्यक्षांनी उडवली खिल्ली, टॉयलेट पेपरशी तुलना करत म्हणाले…

६ जानेवारी २०२१ रोजी जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव केला होता. जो बायडेन यांच्या विजयानंतर ट्रम्प समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला. ही हिंसाचाराची घटना घडल्यावर ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा : व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून अटक वॉरंट, रशियाने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हा निर्णय…”

दरम्यान, २०२४ साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे ७६ वर्षीय नेते असलेले डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणूक लढणार आहेत. ट्रम्प यांना फेसबुकवर ३४ मिलियन लोक फॉलोअ करतात. तर, युट्यूबवर त्यांचे २.६ मिलियन फॉओअर्स आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 09:18 IST