Saif Ali Khan Attacker : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लामचं सीम कार्ड पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बारा अंदुलिया गावातील एका व्यक्तीच्या नावे सीमकार्ड असल्याचं समोर आलं आहे. पण तेथील गावकऱ्यांना याबाबत अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण, या गावातील असंख्य तरुण मुंबईतील हॉटेल्स आणि बारमध्ये काम करायला जातात.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना , त्याचे वडील मोहम्मद रुहुल अमीन फकीर यांनी बुधवारी सांगितले होते की, शरीफुलने गेल्या वर्षी एका मध्यस्थामार्फत भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला, पश्चिम बंगालमधील एका हॉटेलमध्ये महिनाभर काम केले आणि त्यानंतर तो मुंबईला गेला. मुंबई पोलिसांच्या तपासात असे आढळून आले आहे की तो खुकुमोनी जहांगीर या नावाने नोंदणीकृत सिमकार्ड वापरत होता, ज्यावर बारा अंदुलिया गावाचा पत्ता आहे.

नादिया जिल्ह्याचे अधीक्षक काय म्हणाले?

“आमच्याकडे आतापर्यंत मुंबईतून याविषयी कोणतीही विशिष्ट माहिती आलेली नाही. बारा आंदुलिया आणि छपरा यांसारख्या क्षेत्रांची नावे तपासादरम्यान समोर आली आहेत. मुळात या भागातील रहिवासी मोठ्या संख्येने मुंबईत मजूर म्हणून काम करतात. या प्रकरणात पकडलेला आरोपी बांगलादेशी असल्याच्या वस्तुस्थितीशिवाय आमच्याकडे असे कोणतेही इनपुट नाही”, असं नादिया जिल्ह्याचे अधीक्षक के अमरनाथ म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गावातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबईत

ग्रामपंचायत सदस्य जहांगीर मंडोल यांनीही तपासादरम्यान गावाचे नाव समोर आल्याची माहिती नसल्याचे सांगितले. परिसरातील अनेक तरुण कामाच्या शोधात मुंबईला जातात हे सर्वसामान्यांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले. “हे एक लहान, शांत गाव आहे. सिमकार्ड मुंबईत कसे पोहोचले हे मला माहीत नाही”, असं ते म्हणाले. बांगलादेश सीमेपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव ताग आणि इतर पिकांवर अवलंबून आहे, परंतु तरुण अनेकदा चांगल्या संधीच्या शोधात बाहेर पडतात.

सिम कार्डबाबत धक्कादायक माहिती

गावात पोलिस तपासात समोर आलेल्या नावाबद्दल विचारले असता, रहिवाशांनी पाच वर्षांपूर्वी मरण पावलेल्या जहांगीर शेखच्या पत्नी खुकुमोनीकडे लक्ष वेधले. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी सांगितले की तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती तिच्या पतीचा फोन वापरत होती. तिच्या पतीचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला. पण गेल्यावर्षी कृष्णानगर शहरात तिचा फोन हरवला. त्यामुळे मला फोन किंवा सिमकार्डबद्दल इतर काहीही माहिती नाही, असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी तिच्या मुलांसह निघून गेली आणि तिचा फोनही घेऊन गेली. आतापर्यंत तिच्याशी किंवा जहांगीरच्या कुटुंबीयांशी कोणीही संपर्क साधलेला नाही. ग्रामपंचायत सदस्य राजू खलिफा म्हणाले, “यापैकी कोणीही विचारपूस करायला आलेले नाही.