ग्वाल्हेर या ठिकाणी १२ आणखी चित्ते पोहचले आहेत. दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानातून भारतातल्या ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेले आहेत.

कूनो अभयअरण्यात राहणार चित्ते

या १२ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधीही चित्ते भारतात आणले आहेत. भारतातली चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. याआधी ८ चित्ते भारतात आणले गेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले आहेत.

चित्ता भारतातून १९५२ मध्येच नामशेष
१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आलेले चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते सोडले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधानांच्या हस्तो चित्ता सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे, निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये पडली आहे.