छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटीच्या त्रासाला नाहीसे करण्यासाठी झेन्टॅक हे औषध वापरले जाते. अमेरिकेत मात्र या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेनंतर आता भारतानेही या औषधांबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण २६ औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> BJP Protest West Bengal: पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर दगडफेक, जाळपोळ; कार पेटवली, पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचा मारा

Ranitidine हे औषध भारतात Aciloc, Zinetac आणि Rantac या नावांखाली विकले जाते. आम्लपित्त आणि पोटदुखीशी संबंधित समस्यांवर उपचार म्हणून हे औषध दिले जाते. मात्र आता भारताने या औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये एकूण २६ औषधांचा समावेश नाही. यामध्येच Ranitidine या औषधाचाही समावेश आहे.

हेही वाचा >>पश्चिम बंगाल : परवानगी नसताना भाजपाचा ‘चलो नबन्ना’ मोर्चा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं; रेल्वेस्थानक परिसरात राडा

मागील अनेक दिवसांपासून रॅन्टिडाईन हे औषध कॅन्सर उद्भवण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स तसेच डीजीसीआयशी या औषधाविषयी अधिक चर्चा केली. त्यानंतर हे औषध अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. दुसरीकडे केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अन्य काही औषधांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मधुमेहावर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे, इन्सुलिन ग्लेर्जिन, डेलामॅनिड सारखी क्षयरोगविरोधी औषधे तसेच आयव्हरमेक्टिन यांच्यासारख्या अॅन्टीपॅरासाईट औषधांचा समावेश आहे.

हेही वाचा >> तामिळनाडू : हिंदू धर्माविषयी खासदार ए राजा यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले “तुम्ही जोपर्यंत…”

छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटी या सर्रास जाणवणाऱ्या शारीरिक त्रासावर झेन्टॅक हे औषध घेतले जाते. या औषधामुळे अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचा आरोप करत अमेरिकन ग्राहकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र उत्पादक कंपन्यांनी पाच लाख अमेरिकन डॉलरची रक्कम देऊन हे प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटवण्यात आले होते. दरम्यान, अमेरिकन ‘एफडीए’कडून या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. भारतातही झेन्टॅकचे स्थानिक झिंटॅक हे औषध उत्पादन कोणत्याही चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) म्हणजेच ‘ओव्हर द काऊंटर’ विकले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian health ministry rantac zantac is antacid ranitidine removed from essential medicine list for cancer concerns prd
First published on: 13-09-2022 at 17:49 IST