Indian Railways Free WiFi : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता देशभरातील तब्बल ६,११५ रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रेल्वेच्या या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान इंटरनेट वापरणं सोप होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर वायफाय वापरून अनेक प्रवाशी इंटरनेट संबंधित त्यांची कामे सहज करू शकणार आहेत.
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या उद्देशाने देशभरातील ६,११५ रेल्वे स्थानकांवर भारतीय रेल्वे मोफत वाय-फायची सुविधा देत आहे. भारतीय रेल्वेमधील अनेक रेल्वे स्थानकांवर सध्या ४ जी आणि ५ जी वाय-फाय सेवा दिली जाते. या नेटवर्कचा वापर प्रवाशांकडून डेटा कनेक्टिव्हिटीसाठी केला जातो. दरम्यान, खासदार स्वाती मालीवाल यांनी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येत असलेल्या एकूण रेल्वे स्थानकांच्या संख्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती दिली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सेवा?
भारतातील काही प्रमुख रेल्वे स्थानके आहेत, त्या ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध आहे. यामध्ये हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल, नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, अंबाला कॅन्ट जंक्शन, कर्नाल, पानिपत, रोहतक, गुडगाव, सोलन, शिमला, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, रांची, धनबाद जंक्शन, मंगळूर सेंट्रल, यशवंतपूर, बांगरपेट, धारवाड, एर्नाकुलम जंक्शन, कोझिक्कोडे, तिरुवनंतपुरम सेंट्रल, पुणे सेंट्रल, भोईन, मुंबई, भोईपॉलम सेंट्रल भुवनेश्वर, पुरी, कटक, राउर केला, संबलपूर, अमृतसर, जालंधर शहर, लुधियाना, चेन्नई सेंट्रल, काचेगुडा, हैदराबाद, सिकंदराबाद जं, अलाहाबाद, गोरखपूर जं., मुरादाबाद, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, मेरठ सिटी, सियालदह, खरगपूर, जं., बरदह, खरगपूर, जं., बरदहाबाद, बरड, खरगपूर या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे स्थानकांवर वाय-फाय कसं कनेक्ट करावं?
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता देशभरातील तब्बल ६,११५ रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मोफत वाय-फाय सेवेच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे स्थानकांच्या परिसरात एचडी व्हिडिओ स्ट्रीम करू शकतात. तसेच चित्रपट, गाणी देखील डाउनलोड करू शकतात. तसेच ते त्यांच्या ऑफिसचं कामही ऑनलाइन करू शकतात.
रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय कसं वापरायचं?
-तुमचा स्मार्टफोनवर वाय-फाय मोड चालू करा.
-त्यानंतर RailWire वाय-फाय नेटवर्क निवडा.
-त्यानंतर एसएमएसद्वारे वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळवा.
-त्यानंतर ओटीपी एंटर करा आणि हाय स्पीड वाय-फाय वापरण्यास सुरुवात करा.