दिल्ली उच्च न्यायालयाने जेसिका लाल खून खटल्यासंबंधी दोन वर्षे राखून ठेवलेला निर्णय बुधवारी दिला. या खटल्यात खोटी साक्ष दिलेले प्रत्यक्षदर्शी अभिनेता शायन मुन्शी व पी. एस. मनोचा यांच्याविरोधात न्यायालयाने स्वतःहून खटला दाखल करून, त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण ३१ साक्षीदारांपैकी फक्त १९ साक्षीदार या खटल्यासाठी उपलब्ध होते. यातील इतर १७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवल्या आहेत.
पोलिसांची व साक्ष फिरवणा-यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ४ मे २०११ पासून आपला निकाल राखून ठेवला होता. न्या. एस. रविंद्र भट व न्या. जी. पी. मित्तल यांच्या खंडपीठाने या खटल्याबाबत निर्णय दिला. स्वत: न्यायालयाने लक्ष घालून या महत्वाच्या साक्षीदारांनी खटला सुरू असताना साक्षी का बदलल्या असा प्रश्न केला. त्या दोन साक्षीदारांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हरीयाना कॉंग्रेसचे नेते विनोद शर्मांचा मुलगा मनू शर्मा याने एप्रिल १९९९ ला दिल्लीतील बारमध्ये जेसिका लालचा गोळ्या झाडून खून केला होता. मनू शर्माला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
जेसिका लाल खून: साक्ष बदलल्याप्रकरणी अभिनेता शायन मुन्शी, मनोचाची चौकशी
दिल्ली उच्च न्यायालयाने जेसिका लाल खून खटल्यासंबंधी दोन वर्षे राखून ठेवलेला निर्णय बुधवारी दिला. या खटल्यात खोटी साक्ष दिलेले प्रत्यक्षदर्शी अभिनेता शयान मुंशी व पी. एस. मनौंचा यांच्याविरोधात न्यायालयाने स्वतःहून खटला दाखल करून, त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण ३१ साक्षीदारांपैकी फक्त १९ साक्षीदार या खटल्यासाठी उपलब्ध होते. यातील इतर १७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवल्या आहेत.
First published on: 22-05-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jessica lal murder actor shayan munshi ballistic expert manocha to face perjury trial