करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. लशीसाठी नोंद करण्यासाठी सरकारने CoWIN , आरोग्य सेतू व इतर ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध केले आहे. लस घेतल्यानंतर नागरिकांना एक प्रमाणपत्र प्राप्त होते. या प्रमाणपत्रात नाव, जन्म तारीख, वर्ष किंवा लिंग यासारख्या अनेक चुका असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान आता ह्या चुका आपल्याला  CoWIN अ‍ॅपमध्ये सुधारता येणार आहेत, त्या कशा हे समजून घेवूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी व संक्रमित नागरिकांचा शोध घेण्यासाठी सरकारने आरोग्य सेतु अ‍ॅप काढले होते. आरोग्य सेतु ट्विटर हँडलवर लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र प्रक्रीया सांगितली आहे. या प्रमाणपत्रातील चुका कशा दुरुस्त कारायच्या हे देखील सांगितले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (बुधवार)  CoWin अ‍ॅपमध्ये “Raise an issue” विशेष फीचर अ‍ॅड केल्याची माहिती दिली.

समजून घ्या : केंद्र सरकारच्या नवीन नियमानंतर Covishield आणि Covaxin च्या एका डोसची किंमत किती असणार?

CoWIN पोर्टल प्रमाणपत्रातील चुका दुरुस्त करण्यासाठी हे करा

  1.  सर्वप्रथम येथे क्लिक करा http://cowin.gov.in
  2. आपला १० अंकी मोबाइल नंबर प्रविष्ट करुन साइन इन करा
  3. आपल्या फोनवर प्राप्त केलेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करा
  4. त्यानंतर Account Details वर जा
  5. जर तुम्हाला तुमचा पहिला किंवा दुसरा डोस मिळाला असेल तर तुम्हाला ‘Raise an Issue’ बटण दिसेल
  6.  त्यानंतर “Correction in certificate” वर जा आणि प्रमाणपत्रात आवश्यक सुधारणा करा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार देशभरात २३,९०,५८,३६० नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn how to correct mistakes in corona vaccine certificate srk
First published on: 09-06-2021 at 15:43 IST