राज्यामधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच विरोधी पक्ष म्हणजेच भाजपाने राज्य सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातील करोनाच्या वाढत्या आकड्यांसाठी राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. तर दुसरीकडे राज्य सरकार करोनासंबंधित कामं नियोजनानुसारच केली जात असल्याचं सांगताना दिसत आहेत. असं असतानाच राज्य सरकारला दिलासा देणारी एक आकडेवारी समोर आली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामाध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटानायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटलं आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे. तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांची लोकप्रियताही उद्धव ठाकरेंपेक्षा कमी आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत. सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या सहामध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाहीय.

सर्वात कमी लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधील आहे. तळाला असणाऱ्या पाच मुख्यमंत्र्यांपैकी एका राज्यातील सरकारक हे भाजपाच्या पाठिंब्यामुळे स्थापन झालेलं आहे. सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.