महाराष्ट्रतील काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेड मतदार संघातून गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला आहे. भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला आहे. मतमोजणीचा अखेरचा टप्पा सध्या सुरू असून अशोक चव्हाण सध्या 40010 मतांनी पिछाडीवर आहेत. ऐवढी मोठी आघाडी तोडणं शक्य नसल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभा निवडणुकीतील  दुसरा पराभव आहे. अशोक चव्हाण यांच्या पराभवामुळे राज्यात काँग्रेसला मोठ्ठा धक्का मानला जात आहे.

राज्याप्रमाणे नांदेडमध्येही वंचितमुळे काँग्रेसला फटका बसल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना एक लाख ६५ हजार ३४१ मते मिळाली आहेत.  नांदेडमधील धनगर समाजाची मते या निकालात निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

इतिहासात डोकवल्यास नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिला आहे. यंदाची नांदेडकरांनी धक्कादायक निकाल देत देशाचे लक्ष वेधले आहे. इतिहासात डोकावल्यास नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाण यांनाही पराभवाची चव चाखायला लावल्याचे दिसते.

(आणखी वाचा : Lok Sabha 2019 : नांदेडात धक्कादायक निकाल की अशोक चव्हाणांची बाजी?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड यांचा समावेश होतो. यापैकी भोकर, नांदेड उत्तर आणि नायगाव हे 3 मतदारसंघ काँग्रेस, नांदेड दक्षिण आणि देगलूर हे मतदारसंघ शिवसेना आणि मुखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.