महात्मा गांधी यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात असताना सूतकताईसाठी वापरलेल्या चरख्याचा लिलाव ब्रिटनच्या एका प्रख्यात लिलाव गृहाकडून येत्या ५ नोव्हेंबरला होत असून त्यासाठी किमान ६० हजार पौंडाची बोली लागण्याची शक्यता आहे.
गांधीजींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवले होते त्यावेळी त्यांनी सूतकताईसाठी जो चरखा वापरला होता तो अमेरिकी धर्मप्रसारक रेव्हरंड फ्लॉइड ए पफर यांना देण्यात आला होता. पफर हे भारतीय शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील सहकाराचे प्रवर्तक असून त्यांनी बांबूचा धोटा शोधून काढला होता व तो नंतर गांधीजींना चरखा म्हणून दिला. म्युलॉक या लिलावगृहाचे प्रवक्ते  रीचर्ड वेस्टवूड ब्रूक्स यांनी सांगितले की, चरखा हे गांधीजींचे अधिक महत्त्वाचे साधन होते व ते त्या चरख्यावर काम करीत असत. येरवडा कारागृहात काम करीत असताना त्याचा वापर त्यांनी केला होता. त्यांचे महत्त्वाचे चरखा हे साधन होते यात शंका नाही, गांधीजींच्या ६० वस्तूंचा लिलाव आम्ही करणार आहोत त्यात काही छायाचित्रे, पुस्तके, जर्मन ज्यूंना सत्याग्रहाबाबत दिलेल्या सल्ल्याबाबतचे पुस्तक यांचा समावेश आहे.
ब्रिटिशांच्या राजवटीत भारतात कापूस पिकवला जात असे व तो नंतर इंग्लंडला नेऊन त्याचे कपडे तयार करीत असत व नंतर भारतात ते विकत असत. ते कपडे भारतीयांना घेणे परवडत नसत. ब्रिटिश राजवटीला विरोध करण्यासाठी गांधीजींनी चरख्यावर सूतकताई सुरू केली. पारपंरिक चरखा हा जड होता व तो हलवणे सोपे नव्हते. येरवडा कारागृहात असताना गांधीजींनी जो चरखा वापरला होता त्याला एक हँडल होते त्यामुळे तो हलवणे सोपे होते.
सूतकताई हा ध्यानधारणेचाच प्रकार असल्याचे गांधीजी म्हणत असत. शीख व म्हैसूर राजवटीतील अनेक ऐतिहासिक वस्तूंचा लिलावही यात होणार आहे. त्यात एकोणिसाव्या शतकात टिपू सुलतानचे काढलेले चित्र, त्याच्या मुलीचे ब्रिटिश शाळेतील १८३७ मधील चित्र, पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांच्या अगोदरच्या जीवनावरील माहिती, पहिल्या महायुद्धात लढलेल्या मुस्लिम सैनिकांसाठीच्या छोटय़ा कुराण प्रती या वस्तूंचाही लिलाव होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhis prison charkha to be auctioned in uk
First published on: 22-10-2013 at 12:15 IST