पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत बोलताना २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या त्यांच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या की, देशातली अराजकता कमी करण्यासाठी लोकांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच बंगालमधील हिंसाचार आणि भ्रष्टाचारावरून भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. परंतु राज्याच्या सीमावर्ती भागात बीएसएफने म्हणजेच सीमा सुरक्षा बलाने (Border Security Force) दशहत माजवली आहे. सीमावर्ती भागात निर्दोष लोक मारले जात आहेत. परंतु या हत्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने साधी चौकशी समिती नेमण्याचीदेखील तसदी घेतली नाही.

गायीने धडक दिली तर भाजपा आम्हाला भरपाई देईल का?

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी गायीला मिठी मारण्याचा प्रस्ताव केंद्राने मागे घेतला आहे. यावरून भाजपाला लक्ष्य करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर एखादी व्यक्ती गायीला मिठी मारायला गेली आणि गायीने त्या व्यक्तीला टक्कर मारली किंवा लाथ मारली तर काय होईल. भाजपा सरकार लोकांना भरपाई देईल का?

हे ही वाचा >> VIDEO: मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या सुरक्षेत मोठी चूक, ‘समाधान यात्रे’दरम्यान झाला हल्ला

पश्चिम बंगालच्या विधानसभेत गदारोळ

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की, त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या आमर्त्य सेन यांचा पण अपमान केला. दरम्यान, सोमवारी बंगालच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना विधानसभेचे अध्यक्ष बिमान बोस यांनी त्यांचे भाषण पूर्ण करण्यापासून रोखल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर काही वेळाने सभागृहाचे कामकाज सुरू झाले पण यावेळी त्यांनी राज्यपालांवर टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee says bsf spread terror in border areas asc
First published on: 14-02-2023 at 08:23 IST