धक्कादायक ! केरळमध्ये सापडला मेसीच्या चाहत्याचा मृतदेह

केरळमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या चाहत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

केरळमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या चाहत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फिपा फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या पराभवामुळे आणि मेसीच्या खराब कामगिरीमुळे तो निराश होता. गुरूवारी क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यावेळी एक सुसाइड नोट सोडून बेपत्ता झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बिनु एलेक्स (30) असं मृत तरुणाचं नाव आहे. क्रोएशियाविरोधात अर्जेंटिनाचा पराभव झाल्यापासून तो बेपत्ता होता. एक सुसाइड नोट सोडून तो बेपत्ता झाला होता. जगामध्ये बघण्यासाठी किंवा वाट पाहण्यासाठी काहीही बाकी राहिलेलं नाही असं त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं. ते बेपत्ता झाल्यची तक्रार कुटुंबियांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात आली. त्याने नदीत उडी मारल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर कोट्टायम येथील इल्लीकाल ब्रिजजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. पोलीस या प्रखरणी आणखी तपास करत आहेत. त्याच्या मोबाइलमध्ये नेहती मेसीचे फोटो असायटे तसंच वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी त्याने मेसीची जर्सीही खरेदी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Messi fan goes missing in kerala after argentina loss found dead

ताज्या बातम्या