Rhea Singha in Ayodhya Ram Leela: नवरात्री आणि त्यानंतरच्या दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यात गरभा-दांडियासह विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. त्यातही या दिवसांमध्ये विशेषत: उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर ‘रामलीला’ कार्यक्रमाचं सादरीकरण केलं जातं. यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ रिया सिंघा आता रामलीलेमध्ये सहभागी होणार आहे. एवढंच नाही, तर रामलीलेमध्ये रिया प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे!

पीटीआयनं यासंदर्भातला रियाच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये रियानं त्याबाबत माहिती दिली आहे. “मी जगातल्या सर्वात मोठ्या अयोध्येच्या रामलीलामध्ये सीतेच्या भूमिकेत येत आहे. प्रभू श्रीराम व सीतामातेच्या आशीर्वादाने मला रामायणाचा भाग होण्याची संधी मिळाली आहे”, अशी माहिती रियानं दिली आहे.

“गेल्या वर्षी जवळपास ३६ कोटी लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावर्षी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रुपात ५० कोटी लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आयोजक मंडळाचे आभार मानते”, असं रियानं या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

Miss Universe India 2024 ची विजेती ठरली १८ वर्षांची गुजराती तरुणी; कोण आहे रिया सिंघा, जाणून घ्या

मनोज तिवारी रामाच्या भूमिकेत!

दरम्यान, एकीकडे मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंघा सीतेच्या भूमिकेत दिसणार असून दुसरीकडे रामाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते व अभिनेते-गायक मनोज तिवारी हे प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Miss Universe India (@missuniverseindiaorg)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे रिया सिंघा?

अवघ्या १८ वर्षांची रिया सिंघा यंदाच्या वर्षीची मिस युनिव्हर्स इंडियाची विजेती ठरली आहे. त्यामुळे रिया सिंघा आता लवकरच मेक्सिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातून ५०हून अधिक तरुणींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून रिया सिंघाची निवड झाली आहे. रिया सिंघा ही मूळची अहमदाबादची असून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तिनं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. पेशानं रिया एक फॅशन डिझायनर आहे.