Video : असदुद्दीन ओवेसी यांचा नाच पाहून व्हाल थक्क!
असदुद्दीन ओवेसी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला आहे
AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. या सभेनंतर हार घेऊन खाली उतरत असताना त्यांनी ही डान्स स्टेप केली आणि उपस्थितांची मनं जिंकली. वाचा सविस्तर…
रोहित पवारांचं आजोबांच्या पावलावर पाऊल, पावसात भिजत बरसले
सातारा येथील सभेत शरद पवार यांनी पावसाची पर्वा न करता भाषण केलं ही बातमी ताजी असतानाच आता त्यांचे नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे बोलत असताना पाऊस सुरु झाला. भर पावसात त्यांनी भाषण सुरु ठेवलं. रोहित पवार यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. वाचा सविस्तर…
प्रचारानंतर राहुल गांधींची क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग
राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी सध्या हरयाणा येथे प्रचार करत आहेत. प्रचारासाठी जात असताना राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिग करावं लागलं. केएलपी कॉलेज या ठिकाणी हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. हरयाणा या ठिकाणी राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. तिथून हेलिकॉप्टरने दिल्लीला जात असताना ढगाळ वातावरण आणि खराब हवामान यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅन्डिग करावे लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. वाचा सविस्तर…
पदच्युत कर्णधार सर्फराजची पाक क्रिकेट बोर्डाकडून खिल्ली, नंतर सोशल मीडियावर माफीनामा
पाक क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संध्याकाळी टी-२० आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन सर्फराज अहमदची हकालपट्टी केली. सर्फराजच्या नेतृत्वाखाली गेल्या काही स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करु शकला नाहीये. २०१९ इंग्लंड विश्वचषकातही पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. नुकत्याच घरच्या मैदानावर पार पडलेल्या लंकेविरुद्ध टी-२० मालिकेतही पाकिस्तानला ०-३ ने पराभव स्विकारावा लागला. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने सर्फराजच्या जागी अझर अली आणि बाबर आझम यांच्याकडे अनुक्रमे कसोटी आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवलं. वाचा सविस्तर…
शिवसेनेत आला सलमान खानचा शेरा
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत असल्याचे दिसत आहे. त्यातच बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शेराने शुक्रवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवबंधन बांधले. वाचा सविस्तर…