बिहारमधील पाटणाच्या दानापूर न्यायालयात सुनावणीसाठी आमलेल्या एका कैद्यावर पोलिसांसमोरच गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे. दोन जणांनी गोळीबार केला असून दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली. बिहारच्या सिंकदरपूर येथील अभिषेक कुमार ऊर्फ छोटे सरकार (३४) याच्यावर हत्येसह इतर काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. शहरातील बेऊर कारावासातून त्याला पटनाच्या दानापूर न्यायालयात सुनावणी आणण्यात आले, त्यावेळी ही घटना घडली.

हे वाचा >> ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून दोघांना संपवलं,’ अतिक अहमद-अश्रफ अहमद हत्या प्रकरणात आणखी काय समोर आले?

दानापूर न्यायालयाच्या आवारात आल्यानंतर दोन इसमांनी अभिषेकवर हल्ला करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. पोलिस अभिषेकला वाचवू शकले नाहीत, मात्र आरोपींना लगेच अटक करण्यात आली.

पाटणा पश्चिमचे पोलिस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, अभिषेकला दानापूर न्यायालयात आणले असताना त्याच्यावर हल्ला झाला. आम्ही हल्लेखोरांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या हल्ल्यापाठी त्यांचा काय उद्देश होता, कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले? याची आम्ही चौकशी करत आहोत.

अभिषेक कुमार सिकंदरपूरमधील रहिवासी असून तीन भावांमधील तो सर्वात छोटा आहे. अभिषेकवर अर्ध्या डझनभर गुन्हे दाखल आहेत. मारहाण, चोरी, दरोडे अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यांसह जहानाबाद येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे. एका माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या खून केल्याप्रकरणी अभिषेक कुमार त्याचा मोठा भाऊ राहुल कुमारसह कारावासात होता.

हे वाचा >> Atiq Ahmed Murder : एखाद्या हिंदी वेब सीरिजप्रमाणे अतिक अहमदचे आयुष्य होते; नेहरूंच्या मतदारसंघातून झाला होता खासदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक अहमद हत्याकांडाची आठवण

अभिषेक कुमार प्रमाणेच १५ एप्रिल रोजी राजकारणी आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमत या दोघांची प्रयागराज येथे पोलिसांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिस या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी मेडिकल महाविद्यालयात नेत असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी अतिक माध्यमांना प्रतिक्रिया देत होता. सदर हल्ला माध्यमांच्या कॅमेऱ्यातही कैद झाला.