Nepal aircraft crash: नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या विमान अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ भारतीयांचाही समावेश आहे. बचावपथकाला या विमानातील ब्लॅक बॉक्स आढळला असून लवकरच या अपघाताचे नेमके कारण समजणार आहे. अपघातग्रस्त विमानात एकूण ६८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. दरम्यान, या विमानातील एका हवाईसुंदरीचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी या हवाईसुंदरीने हा व्हिडीओ टीकटॉकवर पोस्ट केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Nepal Plane Crash: “शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि…”, त्या चार भारतीय तरुणांची करुण कहाणी

विमान अपघातात मृत्यू झालेल्या या हवाईसुंदरीचे नाव ओसीन आले मागार असल्याचे म्हटले जात आहे. या हवाईसुंदरीने विमानाने उड्डाण घेण्याअगोदर आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ नंतर तिने टिकटॉकवर अपलोडही केला होता. मात्र तिचा हा शेवटचा व्हिडीओ ठरला. या व्हिडीओमध्ये ओसीन आले आनंदी दिसत आहे. विमान अपघातात या हवाईसुंदरीचाही मृत्यू झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> खळबळजनक! दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक; काँग्रेस, शिवसेनेसह बजरंग दलाचे महत्त्वाचे नेते होते निशाण्यावर

विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला

बचाव पथकाला शोधमोहिमेदरम्यान अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होणार आहे. या विमानात एकूण ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. यामध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश, दोन कोरियन, एक अर्जेंटिना आणि एका फ्रेंच नागरिकाचा समावेश होता. विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा >>> नेपाळमधील अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला, दुर्घटनेचे नेमके कारण येणार समोर!

मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश

दरम्यान अपघातग्रस्त विमानात पाच भारतीय प्रवासीदेखील होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असून अभिषेक कुशवाह (२५), सोनू जैस्वाल (३५), विशाल शर्मा (२२), संजय जैस्वाल (३५) आणि अनिल कुमार राजभर (२७) अशी त्यांची नावे आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यातील एक व्हिडीओ तर खुद्द प्रवाशानेच रेकॉर्ड केल्याचेच दिसतेय. अपघाताच्या काही क्षणांअगोदरचा हा व्हिडीओ असून हा अपघात अचानकपणे झाल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal airplane crash air hostess last video went viral prd
First published on: 16-01-2023 at 14:12 IST